श्री राम नवमी 2023 शुभ संयोग मुहूर्त पूजाविधी मंत्र व कथा
चैत्र महिना शुक्ल पक्ष नवमी ह्या तिथीला श्री राम ह्यांचा जन्म झाला होता. म्हणून ह्या दिवसाला राम नवमी म्हणतात. संपूर्ण देशात राम नवमी हा दिवस अगदी भक्ति भावाने साजरा करतात. ह्या दिवशी श्री राम ह्यांच्या बाळ रूपाची शुभ मुहूर्त वर पूजा करून मंत्र जाप करतात.
The text Shri Ram Navami 2023 Shubh Sanyog, Muhurat, Puja Vidhi, Mantra V Katha in Marathi be seen on our You tube Chanel Shri Ram Navami 2023
श्री राम नवमी 2023 ह्या वर्षी 30 मार्च 2023 गुरुवार ह्या दिवशी साजरी करायची आहे.
श्री राम नवमी शुभ संयोग:
सर्वार्थसिद्धि योग- सकाळी: 06:25 पासून 10:59 पर्यन्त मग रात्री अमृतसिद्धि योग, गुरू पुष्य योग व पुन: सर्वार्थसिद्धि योग आहे.
रामनवमी पूजा शुभ मुहूर्त:-
ब्रह्म मुहूर्त:- सकाळी: 04:49 पासून 05:37 पर्यन्त
अभिजीत मुहूर्त:- दुपारी 12:07 पासून 12:55 पर्यन्त
अमृत काल:- संध्याकाळी 08:18 पासून 10:05 पर्यन्त
रामनवमी पूजा सर्वात शुभ मुहूर्त:- 11:11:38 पासून 13:40:20 पर्यन्त
रामनवमी साठी मंत्र:-
ॐ रामभद्राय नम:
ॐ रामचंद्राय नम:
ॐ नमो भगवते रामचंद्राय
रां रामाय नम:
रामनवमी सरल पूजा विधि | Simple worship method of Ram Navami:
1. रामनवमी ह्या दिवशी ब्रह्म मुहूर्तवर स्नान करून व्रत संकल्प करून प्रभु श्री राम ह्यांच्या बाळ रूपाची पूजा करतात.
2. बाळ रामाला पाळण्यात ठेवून पाळणा सजवतात व दुपारी 12 च्या आसपास त्यांची पूजा अर्चा करतात.
3. तांब्याच्या कलशामध्ये पाणी, आंब्याची पाने, नारळ, पान ठेवून तांदळाच्या राशीवर कलश ठेवतात व त्याच्या समोर चार मुखी दिवा लावतात.
4. मग श्री राम यांना खीर, फळ, मिठाई, पंचामृत, कमळ, तुळशी व फुलांचा हार अर्पित करतात.
5. मग नेवेद्य दाखवून श्री विष्णु सहस्त्रनामचे वाचन करतात.
6. मग सर्वाना प्रसाद देतात.
श्रीराम जन्म कथा | Shri ram janm katha:-
श्री रामचरित मानस च्या बाळकांड अनुसार मुलाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी राजा दशरथ ह्यांनी वशिष्ठ यांना श्रृंगी ऋषि ह्यांना बोलवायला सांगितले व त्यांच्या कडून शुभ पुत्रकामेष्टि यज्ञ करून घेतला. श्रृंगी ऋषि दशरथ राजाचे जावई होते त्यांच्या मुलीचे नाव शांता होते. यज्ञ झाल्यावर कौसल्या व बाकी प्रिय राण्यांना एक एक फळ सेवन करायला दिले मग त्यांना पुत्र प्राप्त झाले.
श्री राम ह्यांचा जन्म भारत वर्षमध्ये सरयू नदीच्या तिरी आयोध्या नगरीत एका महालात झाला. ही पवित्र वेळ सर्व लोकांना शांती देणारी होती. राम जन्म झाल्यावर सर्वत्र आनंदी आनंद झाला. शांत सुगंधित हवा सुरू झाली. सर्व देवी देवता हर्षित झाले होते संत लोकांच्या मानत प्रेरणा निर्माण झाली. वन बहरली गेले. सर्व पर्वत मोत्या सारखे चमकायला लागले. सर्व नद्या अमृता सारख्या वहायला लागल्या.
राम जन्म झाल्यावर भगवान ब्रह्म व सारे देवता सजवलेल्या विमानात बसून आले. निर्मल आकाश देवी देवतानी भरून आले. मग श्री राम ह्यांच्या भेटीशी आले.
राजा दशरथ ह्यांनी नांदी श्राद्ध करून जातकर्म संस्कार केले दान धर्म केला. संपूर्ण शहर आनंदीमय झाले सर्वत्र ध्वजा, पताका व तोरण लावण्यात आली. घरा घरात मंगलमय वातावरण झाले.