कराची हलवा | द्राक्षा पासून बनवा बॉम्बे हलवा
आपण रोज जेवण झालेकी काही तरी स्वीट डिश घेतो त्यामुळे अन्नाचे पचन सुद्धा चांगले होते. आपण ह्या अगोदर आमच्या साइटवर बऱ्याच स्वीट डिश कश्या बनवायच्या ते पाहिले आता आपण द्राक्षा पासून स्वीट डिश म्हणजेच कराची हलवा किंवा बॉम्बे हलवा कसा बनवायचा ते पाहूया.
आता द्राक्षाचा सीझन चालू आहे तर हिरवी किंवा काळी द्राक्ष आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होतात. द्राक्षा पासून आपण ज्यूस बनवतो त्याचा वापर करून आपण बर्फी सुद्धा बनवू शकतो. बॉम्बे हलवा खूप टेस्टि लागतो तसेच दिसायला आकर्षक सुद्धा दिसतो.
बनवन्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 4 जनसाठी
साहित्य:
1 कप हिरवी ताजी द्राक्ष
1 छोटी वाटी कॉर्नफ्लोर
1 1/2 छोटी वाटी साखर
2 टे स्पून तूप
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती: द्राक्ष स्वच्छ धुवून घ्या. काजू बदाम व पिस्ता तुकडे करून घ्या. प्लेटला तूप लाऊन त्यामध्ये ड्रायफ्रूट टाकून बाजूला ठेवा.
मिक्सरच्या भांड्यात द्राक्ष घेऊन 1/2 कप पाणी घाला व ब्लेंड करून मिश्रण एका बाउलमध्ये गाळून घ्या. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोर हळू हळू मिक्स करा गुठळी राहता कामा नये.
पॅन मध्ये साखर व अर्धी वाटी पाणी घालून साखर विरघळवून घ्या. साखर विरघळली व एक तारी पाक झाला की त्यामध्ये कॉर्नफ्लोर हळू हळू मिक्स मिक्स करून हलवत रहा हे आपल्याला मंद विस्तवावर करावयाचे आहे. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये साजूक तूप, हिरवा रंग व थोडे ड्रायफ्रूट घालून मिक्स करा.
आता घट्ट झालेले मिश्रण तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून हळुवार पणे एक सारखे करून घ्या. मग मिश्रण सेट करण्यासाठी 2 तास बाजूला ठेवा. कराची हलवा सेट झालाकी त्याचे तुकडे करून एका प्लेट मध्ये काढून सर्व्ह करा. राहिलातर फ्रीजमद्धे ठेवून नंतर सर्व्ह केला तरी छान लागतो.