६ एप्रिल २०२३ गुरुवार हनुमान जयंती | हनुमानजींचा कसा झाला जन्म | पूजा मुहूर्त | मंत्र विडियो
हनुमान जयंती ६ एप्रिल २०२३ गुरुवार ह्या दिवशी आहे. हनुमान जयंती च्या दिवशी श्री हनुमान ह्यांची कथा आईकल्यास बजरंगबली ह्यांची कृपा प्राप्त होते. वर्षात दोन वेळा हनुमान जयंती साजरी करतात. उत्तर भारत मध्ये हनुमान जयंती चैत्र महिन्यातील पूर्णिमा व दुसरी कार्तिक महिन्यात. महावीर हनुमान भगवान शिव ह्यांचे ११ वे रुद्र अवतार मानले जातात. व प्रभु श्री राम ह्यांचे एकनिष्ट भक्त आहेत. ह्या दिवशी हनुमान ह्यांनी वानर जातीत जन्म घेतला. हनुमान जी हे असे देवता आहेत जे त्रेतायुग पासून आज पर्यन्त शीघ्र प्रसन्न होणारे देवता मानले जातात. असे म्हणतात की जेथे राम कथा असते तेथे हनुमानजी कोणत्या ना कोणत्या रूपात हजर असतात. हनुमान जयंती च्या दिवशी हनुमान जीनची जन्म कथा जरूर आइकावी.
The text 6 April 2023 Hanuman Jayanti | Muhurat | Katha | Mantra in Marathi be seen on our You tube Chanel 6 April 2023 Hanuman Jayanti
हनुमान जयंती २०२३ मुहूर्त:
चैत्र पूर्णिमा तिथि प्रारंभ ५ एप्रिल २०२३ सकाळी ९ वाजून १९ मिनिट
चैत्र पूर्णिमा समाप्ती ६ एप्रिल २०२३ सकाळी १० वाजून ४ मिनिट
शुभ (उत्तम) मुहूर्त सकाळी ०६ वाजून ६ मिनिट ते सकाळी ७ वाजून ४० मिनिट
लाभ (उन्नति) दुपारी १२ वाजून २ मिनिट ते दुपारी १ वाजून ५८ मिनिट
हनुमान जयंती कथा (Hanuman Jayanti Katha)
हनुमान जी ह्यांना केसरीनंदन व आंजनाय पुत्र म्हंटले जाते. व मान्यता अनुसार हनुमानजीना पवन देवाचे पुत्र असे सुद्धा मानले जाते. पौराणिक कथा अनुसार त्रैतायुग मध्ये राजा दशरथ ह्यांनी पुत्र प्राप्ती साठी हवन केले होते व हवन समाप्ती झाल्यावर गुरुदेव ह्यांनी प्रसाद म्हणून दशरथ राजाच्या तिन्ही राण्या कौशल्या, सुभद्रा व कैकेयी ह्यांना वाटली होते व एक पक्षी त्यामधील थोडीशी खीर घेऊन गेला व उडत उडत तो पक्षी अंजना माताच्या आश्रमा मध्ये गेला तेव्हा माता अंजना तपस्या करीत होती. तेव्हाच त्या पक्षाच्या चोची मधील खीर अंजना माताच्या हातावर पडली व माता अंजना नी भगवान भोलेनाथ ह्यांचा प्रसाद समजून ती खीर ग्रहण केली. प्रसादाचा प्रभाव व ईश्वर कृपामुळे माता अंजनानी शिव अवतार बाळ हनुमानना जन्म दिला तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्ष पूर्णिमा ही तिथी होती.
हनुमान जयंतीच्या दिवशी कशी करावी पूजा:
हनुमान जयंती ह्या दिवशी बजरंगबली ना चमेलीचे तेल मिक्स करून शेंदूर लावावा. अक्षता, कनेर, जास्वंदी व गुलाब फूल अर्पित करावी. नेवेद्य म्हणून मालपुवा, बेसनचे लाडू अर्पित करा.
ॐ हं हनुमते नमः ह्या मंत्राचा १०८ वेळा जाप करावा. हनुमान चालीसाचे वाचन करावे. हनुमान जीनची आरती म्हणावी.