अक्षय तृतीया २०२३ करा हे उपाय माता लक्ष्मी प्रसन्न होऊन दारिद्रता होईल दूर:
अक्षय तृतीया हा दिवस माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. तसेच ह्या दिवशी काही उपाय केलेतर माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपली रिकामी झोळी भरून देईन व आपले घर सुख समृद्धीनी भरून जाईन. अक्षय तृतीया ह्या दिवशी कोणते सुद्धा चांगले कार्य केल्याने अक्षय फळ मिळते. म्हणूनच ह्या दिवशी केलेले उपाय फलदाई होतात. आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मळतो.
आपण पाहू या अक्षय तृतीयाला कोणते उपाय केले पाहिजेत.
अक्षय तृतीया ह्या दिवशी खरेदी करणे शुभ असते त्याच बरोबर दानधर्म करण्याचे महत्व सुद्धा आहे. ह्या दिवशी जरूरत मंद लोकांना मदत करून दान म्हणून वस्तु द्या. आपण ह्या दिवशी कोण कोणत्या वस्तु दान करू शकता.
१) अक्षय तृतीया ह्या दिवशी धन वृद्धिचा उपाय:
अक्षय तृतीया ह्या दिवशी जवस दान करणे म्हणजे सोने दान करण्या सारखे पुण्य काम मानले जाते. आपण सोने खरेदी करण्याच्या बरोबर जवस सुद्धा खरेदी करा. असे केल्याने आपल्या धनामध्ये वृद्धी होऊन माता लक्ष्मी प्रसन्न होईल. जर आपल्याला सोने खरेदी करणे शक्य नाहीतर चांदी खरेदी करू शकता. किंवा जवस तरी दान करा.
२) माता लक्ष्मी बरोबर विष्णु भगवानची पूजा अर्चा करा:
माता लक्ष्मी बरोबर विष्णु भगवानची पूजा अर्चा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल व आपले वैवाहिक जीवन सुखी होईल व माता लक्ष्मीची कृपा होऊन धनाची कमी होणार नाही. त्याच बरोबर श्री गणेशजीनची पूजा अर्चा करा माता लक्ष्मी ला मखानेची खीर प्रसाद म्हणून दाखवा. त्यामुळे घरात सुख समृद्धी येईल.
३) कलश दान:
अक्षय तृतीया ह्या दिवशी पाणी भरून कलश दान करणे शुभ मानले जाते. सर्वात पहिल्यांदा एक कलश घेऊन त्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी भरून थोडेसे गंगाजल टाकून गरीबला दान करा. असे केल्याने तीर्थ यात्रा केल्याचे पुण्य मिळते.
अक्षय तृतीया असे का म्हणतात:
पौराणिक मान्यता अनुसार वैशाख महिन्यातील शुल्क पक्ष तृतीया ला ब्रह्म देवाचे पुत्र अक्षय कुमार ह्यांची उत्पत्ति झाली होती. म्हणून ह्या दिवसाला अक्षय तृतीया म्हणतात. ह्या दिवशी पितरांना तर्पण व पिंडदान करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अक्षय फळाची प्राप्ती होते. व नेहमी सुखी राहण्याचा आशीर्वाद मिळतो.
अक्षय तृतीया ह्या दिवशी काही वस्तुचे दान करा:
आपल्या घरात बरेच दिवसांपासून आर्थिक तंगी आहे तर पुढे दिलेल्या वस्तूंचे दान करा. पाणी, कुंभ, साखर, सतू, पंखा, छत्री, फळ इ.
असे म्हणतात की अक्षय तृतीया ह्या दिवशी ह्या वस्तु दान केल्या तर माता लक्ष्मी स्वतः प्रकट होऊन आर्थिक तंगी दूर करते.