थंड कूल लाजवाब ब्रेड कस्टर्ड पूडिंग सुट्टीमध्ये मुलांसाठी
आता उन्हाळा सीझन चालू झाला आहे व मुलांच्या परीक्षा संपून सुट्ट्या सुद्धा चालू झाल्या आहेत. मग रोज जेवण झाल्यावर थंड गार काही तरी पहिजे. आपण आइसक्रीम, फ्रूट सॅलड, निरनिराळे ड्रिंक्स बनवतो.
आज आपण एक खूप छान डेझर्ट बनवणार आहोत. ब्रेड व कस्टर्ड पावडर वापरुन खूप छान रेसीपी आहे तसेच बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. ह्या मध्ये तुपामध्ये थोडा भाजून वापरला आहे त्यामुळे छान टेस्ट येते. समरसाठी हे एक मस्त परफेक्ट पूडिंग आहे.
थंड कूल लाजवाब ब्रेड कस्टर्ड पूडिंग चा शॉर्ट विडियो आपण येथे क्लिक करून पाहू शकता: थंड कूल लाजवाब ब्रेड कस्टर्ड पूडिंग
ब्रेड कस्टर्ड पूडिंग आपण जेवण झाल्यावर सर्व्ह करू शकतो किंवा कोणी पाहुणे आलेतर किंवा इतर वेळी सुद्धा सर्व्ह करू शकतो. ह्या पूडिंगची टेस्ट अगदी निराळी लागते करून पहा नक्की सर्वाना आवडेल.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणसाठी
साहित्य:
१/२ लीटर दूध
४ ब्रेड स्लाइस
४ टे स्पून कस्टर्ड पावडर (व्हनीला)
४ टे स्पून साखर
२ टे स्पून तूप
ड्रायफुट सजावटीसाठी
कृती: एका बाउलमध्ये १/२ कप दूध व कस्टर्ड पावडर मिक्स करून घ्या. दूध गरम करून त्यामध्ये हळू हळू कस्टर्ड पाऊडर मिक्स करून घट्ट व्हायला आलेकी साखर घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.
एक ब्रेड स्लाइसचे ४ तुकडे कापून घ्या. नॉन स्टिक पॅन मध्ये तूप घालून त्यावर ब्रेडचे तुकडे थोडा गोल्डन ब्राऊन रंग येई पर्यन्त भाजून घ्या.
एका काचेच्या ट्रेमध्ये ब्रेडचे निम्मे तुकडे अरेंज्ड करून घ्या. मग त्यावर कस्टर्ड घाला परत त्यावर ब्रेड चे तुकडे अरेंज्ड करून परत कस्टर्ड घालून वरतून ड्रायफ्रूट ने सजवून फ्रीजमध्ये १-२ तास थंड करायला ठेवा.
थंड झाल्यावर ब्रेड कस्टर्ड पूडिंग सर्व्ह करा.