स्वादिष्ट मऊ लुसलुशीत बेसन बर्फी अगदी निराळी पद्धत
आता आंब्याचा सीझन चालू आहे आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवू शकतो. आपण नेहमी बेसन बर्फी बनवतो. बेसन बर्फी ही खूप छान स्वीट डिश आहे. आपण साणाला सुद्धा बनवतो किंवा इतर वेळी जेवण झाल्यावर स्वीट डिश म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो. बेसन बर्फी अगदी हलवाईच्या दुकानासारखी आपण घरी बनवू शकतो. अगदी झटपट सोप्या पद्धतीने कशी बनवू शकतो ते आपण ह्या विडियो मध्ये पाहू शकता.
The text Sweet Delicious Besan Mango Barfi Unique Style i n Marathi be seen on our You tube Chanel Sweet Delicious Besan Mango Barfi Unique Style
बेसन बर्फी बनवताना आपण त्यामध्ये एक ट्विस्ट करायचा आहे त्यामध्ये आपण मॅंगो पल्प मिक्स करायचा आहे त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतिम लागते. आंबा वापरल्यामुळे त्याचा सुगंध व टेस्ट व छान येते.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: १२ वड्या बनतात.
साहित्य:
१ कप बेसन
३ टे स्पून तूप
१/२ कप साखर
१ कप आंब्याचा रस
१ टी स्पून वेलची पावडर
२ टे स्पून ड्रायफ्रूट (तुकडे करून)
कृती:
आंब्याचा रस काढून एकदा मिक्सर मध्ये ब्लेंड करून घ्या. एक स्टीलच्या ट्रेला तूप लावून घ्या. ड्रायफ्रूटचे तुकडे करून घ्या.
पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये बेसन घालून मिक्स करून मंद विस्तवावर छान खमंग भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर एक प्लेटमध्ये काढून घ्या.
त्याच पॅनमध्ये साखर व आंब्याचा रस गरम करायला ठेवा व मंद विस्तवावर थोडा आटवून घ्या. म्हणजे थोडा घट्ट झाला पाहिजे मग त्यामध्ये भाजलेले बेसन घालून मिक्स करून परत घट्ट होई पर्यन्त हालवत रहा. मग त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
मिश्रण घट्टसर वाटले की विस्तव बंद करून मिश्रण तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून एक सारखे करून त्यावर ड्रायफ्रूटच्या तुकड्यांनी सजवून थंड करायला ठेवा.
मिश्रण थंड झाल्यावर त्याचे छोटे छोटे पिसेस कापून मग सर्व्ह करा.