घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे अचूक उपाय एकदा करून पहा
वास्तु शास्त्रनुसार घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी काही विशेष अचूक उपाय आहेत ते आपण आचरणात आणून वास्तु दोष नष्ट करू शकता.
The text Vastu tips for Negative Energy in Marathi be seen on our You tube Chanel Vastu tips for Negative Energy
वास्तु दोष घालवण्यासाठी बरेच वेळ घरातील वस्तु ठेवण्याची जागा ही सुद्धा महत्वपूर्ण मानली जाते. आपले संपूर्ण घर पंचतत्वनी मिळून बनलेले असते. तसेच प्रेतक वस्तुची योग्यती दिशा ठरलेली असते. पण घर बनवताना आपल्या कडून अनाहूत काही चुका होतात त्यामुळे वास्तु दोष निर्माण होतो. अश्या वेळी घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी वास्तु दोष उपाय केले तर वास्तु दोष दूर होईल.
ईशान कोनामध्ये कलश ठेवावा:
ईशान कोनामध्ये आपण कलश स्थापना जरूर केली पाहिजे. कारण की कलश म्हणजे श्री गणेश भगवान ह्यांचे स्वरूप मानले जाते. त्यामुळे आपलीला गणेश भगवान ह्यांची कृपा मिळते व घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.
रॉक सॉल्टचा उपाय:
वास्तु शास्त्र नुसार मिठाचा वापर केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा मीठ आता खेचून घेण्याचा गुण आहे. घरात फरशी पुसताना पाण्यात थोडे खडे मीठ टाकावे. पण फक्त गुरुवार मीठ टाकू नये बकीच्या दिवशी मीठ टाकावे. काचेच्या भांड्यात मीठ ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते.
पंचमुखी हनुमानचा फोटो घरात लावावा:
ज्यांच्या घराचे मुख्य प्रवेश दार दक्षिण दिशेला आहे त्यांनी प्रवेश दारावर पंचमुखी हनुमानचा फोटो लावावा त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही व बरेच लाभ होतात व शुभ मानले जाते. घरात जय ठिकाणी वास्तु दोष आहे तेथे थोडासा कापूर ठेवावा जेव्हा कापुर संपेल तर परत ठेवावा. असे केल्याने आपल्याला बरेच लाभ होतील घरात धन धान्यमध्ये वृद्धी होईल.
घडयाळ ह्या दिशेला लावावे:
वास्तु शास्त्र अनुसार घडयाळ कोणत्या दिशेला ऊर्जावान बनवते. घरातील बंद घडयाळ सर्वात पहिले काढून टाका कारण की बंद घडयाळ वेळ व पैसा ह्या मध्ये रुकावट आणण्याचे प्रतीक मानले जाते. उत्तर किंवा पूर्व ह्या दिशेला लावावी.
घरात आपल्या कुटुंबाचे फोटो लावावे:
आपल्या घरातील ड्रॉइंग हॉल म्हणजेच बसण्याची खोली त्यामध्ये आपल्या कुटुंबाचे फोटो लावावे त्यामुळे आपल्या नाते संबंधात प्रेम वाढते व सकारात्मक ऊर्जा येते. फोटो अश्या ठिकाणी लावा की घरात आलेल्या पहुण्यांना टे फोटो समोरच दिसतील. अश्या मुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा येईल.
तुळशीचे रोप जरूर लावावे:
नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी घरात पूर्व दिशेला तुळशीचे रोप लावा. त्यामुळे सुद्धा घरात सकारात्मक ऊर्जा येऊन नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते.
सुगंधित धूपबत्ती लावा:
घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करण्यासाठी सुगंधित अगरबत्ती जरूर लावा त्यामुळे पॉजिटिव एनर्जी येऊन रात्री चांगली झोप येते.
घोड्याची नाल लावा:
घोड्याची नाल वरच्या बाजूला टोकदार बाजू येईल अश्या प्रकारे लावा त्यामुळे चांगली ऊर्जा आकर्षित होईल. घोड्याची नाल लावल्याने धनाचे आकर्षण होते व नकारात्मक ऊर्जा पासून मुक्ती मिळते.