अगदी नवीन किचन टिप्स आईकल्यावर म्हणाल पहिले का नाही सांगितल्या
स्वयंपाक करणे ही एक कला आहे तसेच स्वयंपाक करता करता वेळ व जागृतता असणे फार महत्वाचे आहे. कारणकी स्वयंपाक करताना लापरवाहि असणे म्हणजे आपला स्वयंपाक बिघडणे. म्हणजे कधी मीठ जास्त होणे, भाजी करपणे अश्या प्रकारे नुकसान होऊ शकते. बरेच वेळा आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात त्यामुळे सुद्धा नुकसान होते. मग वेळ व पदार्थ वाया जाऊ शकतो.
आपण जेवण बनवताना काही पुढे दिलेल्या टिप्स लक्षात घेतल्या तर आपले जेवण कमी वेळात स्वादिष्ट बनू शकते.
The text Tips And Tricks: Useful Kitchen Tips in Marathi be seen on our You tube Chanel Tips And Tricks: Useful Kitchen Tips
किचन ट्रिक्स व टिप्स पुढे देत आहोत:
१. गुळाचा पाक बनवण्याच्या अगोदर कढईला थोडसे तूप किंवा तेल लावावे म्हणजे कढईला गुळाचा पाक चिटकत नाही.
२. आपण मलई साठवून ठेवतो जेव्हा आपल्याला मलई पासून लोणी काढायचे आहे तेव्हा एक चमचा साखर घालून मलई फेटावी म्हणजे लोणी जास्त प्रमाणात निघते.
३. गुलाबजाम बनवताना ते एकदम सॉफ्ट व आतून एकदम रसाळ पाहिजे असेलतर खवा (मावा) मध्ये थोडेसे पनीर किंवा छेना मिक्स करून बघा त्यामुळे गुलाबजाम छान मऊ व रसाळ बनतील.
४. रसगुल्ले स्पंजी बनवण्यासाठी रसगुल्ले साखरेच्या पाण्यात टाकल्यावर उकळी पाण्याला उकळी आली की १-२ टे स्पून पाणी घाला त्यामुळे साखरेचा पाक घट्ट होत नाही व रसगुल्ले स्पंजी होतात.
५. जर दही जमत नसेलतर एका थाळी मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये दह्याचे भांडे ठेवावे. एका तासात दही जमेल. पण भांडे हलवायचे नाही ते स्थिर राहिले पाहिजे.
६. आंब्याचे लोणचे जास्त दिवस स्टोर करण्यासाठी मधून मधून ऊन दाखवावे. तसेच लोणच्याची बरणी कोरड्या जागी ठेवावी. जेव्हा लोणचे खावेसे वाटेल तेव्हा कोरडा चमचा वापरुन लोणचे काढावे. सारखे सारखे बरणीतून लोणचे बाहेर काढू नये.
७. आंब्याचे लोणचे बनवताना त्यामध्ये थोडासा गूळ घालावा. त्यामुळे स्वादिष्ट लागते.
८. शहाळे फोडण्यासाठी प्रथम त्यामधील पाणी वरती भोक पाडून काढून घ्यावे मग शहाळे विस्तवावर २-३ मिनिट ठेवावे त्यामुळे त्याचा कडक भाग लगेच निघेल.
९. केळ्याचा घड लटकवून ठेवला तर जास्त दिवस केळी ताजी राहतात.
१०. दुधामध्ये जास्त मलई येण्यासाठी दूध गरम करून थंड करून घ्या. मग ते फ्रीजमध्ये ठेवा. त्यामुळे दुधावर जाड साय येते.
११. फ्रीजमध्ये दुर्गंधी येत असेलतर एका वाटीमध्ये लाकडाचा कोळसा ठेवून फ्रीज मध्ये ठेवा. त्यामुळे फ्रीज मधील दुर्गंधी निघून जाईल.
१२. हिरवी मिरची आणली की त्याचे देठ काढून मगच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे जास्त दिवस ताजी राहते.
१३. कांदा फ्राय करताना त्यामध्ये एक चिमूत साखर टाका त्यामुळे तो लवकर कुरकुरीत होते.
१४. दुधा पासून घरी पनीर बनवताना पनीर बनवून राहिलेले पाणी फेकून न देता ते पीठ मळताना वापरावे. कारणकी ते खूप पौस्टिक असते.
१५. दही वडे बनवताना वाटलेल्या उडीद डाळी मध्ये थोडासा रवा घालून चांगले फेटून घ्या. त्यामुळे वडे छान मऊ होतात.