बाथरूम किंवा किचनचा ड्रेनेज पाइप जाम (चोक) झाला कसा साफ करावा?
आपल्या घरातील बाथरूम किंवा किचन मधील सिंकचा ड्रेनेज पाइप चोक झाला तर आपल्याला खूप परेशानी होते. जर आपण त्यासाठी काही सोप्या टिप्स किंवा ट्रिक्स वापरल्या तर आपले काम सोपे होण्यास मदत होऊन बंद झालेला ड्रेनेज पाइप मोकळा होतो.
किचन मधील ड्रेनेज पाइपमध्ये बरेच वेळा कचरा सचून राहतो त्यामुळे सुद्धा चोकअप होते. त्यामुळे पाणी सुद्धा खूप हळू हळू जाते. त्यामुळे पूर्ण दिवसाच्या कामावर त्याचा प्रभाव होतो. बरेच वेळा लोक बंद झालेली नाली उघडण्यासाठी निरनिराळे केमिकल किंवा एसिड वापरत असतात. उलट त्यामुळे आपल्या घरातील फरशी खराब होते. पण आज आम्ही अगदी सोपे कमी खर्चाचे उपाय सांगणार आहोत ज्याने चोकअप झालेली नाली लगेच उघडेल.
The text Tips And Tricks: Blocked Drain Remedies in Marathi be seen on our You tube Chanel Tips And Tricks: Blocked Drain Remedies
1. बेकिंग सोडा व व्हाइट विनेगर:
एक कप बेकिंग सोडा व १/३ कप व्हेनिगर मिक्स करून घ्या. मग ते मिश्रण नाली मध्ये टाकून एक
तास किंवा रात्रभर तसेच ठेवा. त्यामुळे ब्लॉकेज व दुर्गंधी निघून जाईन.
2. उकलते गरम पाणी टाका:
नाली मधील ब्लॉकेज काढण्यासाठी उकलते पाणी टाका. पण पाणी टाकताना दोन स्टेजमध्ये टाका. म्हणजे एकदा पाणी टाकले की काही मिनिट झाल्यावर परत एकदा पाणी टाका. त्यामुळे नाली मध्ये आडकलेला मळ किंवा चिकट पदार्थ गरम पाण्यानी निघून जाईन.
३. मीठ व बेकिंग सोडा:
मीठ व बेकिंग सोडा ह्यांचे मिश्रण नाली मधील ब्लॉकेज काढण्यासाठी प्रभावी आहे. त्यासाठी १/२ कप बेकिंग सोडा व १/२ कप मीठ मिक्स करून नालीमध्ये घाला. अर्धा तास तसेच ठेवा किंवा रात्रभर तसेच ठेवा. त्याने नाली साफ होईल.
४. प्लंजर म्हणजेच पंपाची मदत घ्या:
आपल्या जर काही उपाय करायला वेळ नसेल तर प्लंजर म्हणजेच पंपाची मदत घ्या. प्लंजर म्हणजे एक लाकडी छडी असते व त्यावर रबराच एक सक्शन कप असतो. त्यासाठी पहिल्यांदा सिंकमध्ये एक कपडा ओला करून ठोसून पाणी टाका मग रबरी पंप ठेवून फटाफट वर खाली असे जोरात दाबा.
त्यामुळे किचन सिंक व बाथरूमचा पाइप नेहमी स्वच्छ ठेवा.