टिप्स व ट्रिक्स: फ्रीजची सफाई अश्या प्रकारे केलीतर, बरेच वर्ष फ्रीज नव्या सारखा दिसेल
आपल्या फ्रीजमध्ये डाग धब्बे पडले आहेत व ते निघत नाहीत किंवा आपल्याला ते काढण्यासाठी त्रास होत आहे तर येथे काही सोप्या टिप्स व ट्रिक्स दिल्या आहेत त्या आचरणात आणून आपण आपल्या फ्रीजची साफसफाई अगदी बिना त्रासन होता करू शकता. खर म्हणजे आपण फ्रीजची सफाई वेळो वेळी केली पाहिजे म्हणजे नेहमी अगदी नव्या सारखा दिसेल.
The text Tips & Trciks: How To Clean a Refrigerator Inside And Outside in Marathi be seen on our You tube Chanel Tips & Trciks: How To Clean a Refrigerator Inside And Outside
फ्रीज हे उपकरण सर्वच घरांमध्ये असते कारण की ते खूप उपयोगी आहे. आपण फळे, भाज्या, खाण्या पिण्याच्या वस्तु खराब होऊ नये म्हणून ठेवतो. त्यामुळे आपण फ्रीजची साफसफाई नेहमी केली पाहिजे.
आपल्या घराची जशी आपण साफसफाई करतो तसेच फ्रीजची सुद्धा साफ सफाई केली पाहिजे. आम्ही येथे काही स्मार्ट सोप्या टिप्स सांगत आहोत.
१. ट्रे व ड्रॅावर:
जर आपल्या फ्रीजच्या ट्रे व ड्रॅावरवर चिकट डाग पडले आहेततर कोमट पाण्यामध्ये साबण पाऊडर घालून त्यामध्ये ट्रे व ड्रॅावर थोडावेळ ठेवावा. मग डिशवॉश जेल चा उपयोग करून चिकट पणा घालवावा. किंवा साबणाचे पाणी करून त्यान स्वच्छ पुसावे.
२. फ्रीजच्या आतील व बाहेरील सफाई:
फ्रीजच्या आत मधील सफाई करण्यासाठी क्लीनिंग सॉल्यूशन बनवण्यासाठी एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये डिशवाशिंग लिक्विड टाका मग स्वच्छ स्पंज बुडवून फ्रीज साफ करून घ्या मग स्वच्छ कॉटनच्या कापडानी पुसून काढा.
३. दरवाजा व हँडलची सफाई:
एका बाउलमध्ये गरम पाणी व १/२ टे स्पून डिशवॉश लिक्विड व १/२ टे स्पून व्हेनिगर घालून पासून काढा. हे मिश्रण खूप फायदेशीर आहे.
४. गॅसकेटची सफाई अश्या प्रकारे करा:
एक कप व्हेनिगर व एक कप पाणी बाउलमध्ये मिक्स करून स्वच्छ कापड त्यामध्ये बुडवून फ्रीजचे गॅसकेट पुसून काढा. आपल्या दात साफ करण्याच्या ब्रशनी साफ करून मग परत एकदा पुसून घ्या.
५. जिद्दी डाग असतील तर:
२ टे स्पून व्हेनिगर व २ टे स्पून बेकिंग सोडा मिक्स करून त्याची पेस्ट बनवून साफ कापडानी डांगावर घासावी. मग स्वच्छ पाण्यानी डाग पुसून काढावा. फ्रीजच्या आतील कोन सुद्धा असेच साफ करावे.
६. फ्रीज मध्ये दुर्गंध येतो:
फ्रीजमध्ये जर दुर्गंध येत असेलतर व्हाईट व्हेनिगरनी फ्रीज आतून पुसून घ्या. तसेच फ्रीजच्या आता नेहमी एक लिंबाची फोड कापून ठेवावी त्यामुळे फ्रीजमध्ये वास येत नाही.
7. फ्रीज साफ करताना घ्यावयाची काळजी:
फ्रीज साफ करण्याच्या वेळी फ्रीज मधील सर्व सामान बाहेर काढा. स्विच बंद करा. फ्रीजच्या खाली पेपर किंवा एक कपडा टाका त्यामुळे पाणी पडले तर जमीन ओली होणार नाही. भाज्या बाहेर काढून हवा लागेल अश्या ठेवा.
8. फ्रीज पुसून झाल्यावर लगेच त्यामध्ये सामान ठेवू नये थोडा वेळ जाउद्या मगच ठेवा.