टिप्स अँड ट्रिक्स: त्वचा व केसांसाठी लिंबू वापरण्याची योग्य पद्धत
आपण आपल्या पायाच्या काळे पणा कमी करण्यापासून ते केस धुण्या पर्यन्त लिंबूचा वापर करू शकतो.
लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामीन सी असते. खाण्याच्या वस्तु पासून ते आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी लिंबूचा वापर आपण करतो. त्याच बरोबर लिंबूचा उपयोग आपले सौन्दर्य वाढवण्यासाठी सुद्धा केला जातो.
The text Tips & Tricks:Benefits Of Lemon For Skin And Hair in Marathi be seen on our You tube Chanel Tips & Tricks:Benefits Of Lemon For Skin And Hair
कॉस्मेटिक इंग्रीडियंट्स च्या रूपात लिंबू ही वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाते. पण एक लक्षात घ्या की लिंबुरस डायरेक्ट वापरू नये. कारण की ते आपल्या त्वचेला हानी पोचवू शकते.
आज आपण बघणार आहोत की लिंबू आपण आपल्या त्वचा व केसांसाठी कसे वापरायचे:
हाताचे कोपरे व गुडघे काळेपणा कसा कमी करायचा:
जर आपल्या हाताचे कोपरे काळे झालेत किंवा गुडघे काळे झाले आहेत तर लिंबू वापरा. त्यासाठी आपल्याला अर्धे लिंबू कोपऱ्यावर चोळायचे आहे. मग थंड पाण्यानी धुवायचे आहे. हळू हळू काळे पणा कमी होत जाईल.
लिंबू आपण लोशन सारखे वापरू शकतो:
आपण लिंबूचा वापर हँड लोशनच्या रूपात सुद्धा करू शकतो. लिंबूरसा मध्ये गुलाबपाणी मिक्स करून आपल्या हातांवर लावू शकतो. जर आपले हात रफ आहेत तर साखरेमध्ये लिंबुरस मिक्स करून हातांवर चांगली चोळा मग पाण्यानी हात स्वच्छ धुवा. असे थोडे दिवस रोज करा त्यामुळे आपल्या हाताची स्कीन छान सॉफ्ट होईल.
ऑईली स्कीनसाठी लिंबू:
ऑईली स्कीनसाठी लिंबूचा वापर केला जाऊ शकतो. त्यासाठी एक ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये १/२ चमचा लिंबुरस घालून मिक्स करून चेहऱ्यावर लावा. जर आपल्या स्कीनला लिंबूनी त्रास होत असेलतर थोडे अजून पाणी मिक्स करा. नंतर चेहरा टिशू पेपरनी हळुवार पणे पुसा. लिंबूच्या वापरा मुळे फक्त एसिड अलकलाईन बॅलेन्स रहाते व त्याच बरोबर स्कीन मधील ऑइल सुद्धा शोशले जाते. गरमीमध्ये लिंबूचा वापर करणे खूप फायदेशीर आहे कारण की आशा वेळी त्वचा जास्त ऑईली होते.
आपण लिंबूरस मध्ये मध मिक्स करून सुद्धा चेहऱ्याला लाऊ शकता. मध त्वचा मॉइस्चराइज करते. लिंबू रस सामान्य त्वचा संतुलित ठेवते व नियमित रूपात लावल्यास काही दिवसांनी त्वचा उजळ बनते. ऑईली स्कीनसाठी एक भाग मध व दोन भाग लिंबुरस मिक्स करून लावावे. सामान्य व कोरडी त्वचासाठी मध व लिंबुरस सम प्रमाणात घ्यावे.
केसांसाठी लिंबुरस कसा वापरायचा:
लिंबूरस केस धुण्यासाठी सुद्धा करू शकता. त्यासाठी एक मग पाणी व थोडा लिंबुरस मिक्स मिक्स करून शांपु केल्यावर मग लिंबूच्या पाण्यानी केस धुवावे.
टीप:
काही जणांची त्वचा खूप सेनसेटीव्ह असते. जर आपल्या त्वचेला लिंबूरस वापरल्यानी खाज येत असेल तर वापरू नये. किंवा लिंबुरस डायलयूट केल्या शिवाय वापरू नये. त्याच बरोबर लिंबुरसचे प्रमाण योग्य ठेवा. १/२ चमचा पेक्षा जास्त लिंबुरस वापरू नये त्यामुळे त्वचेला नुकसान होऊ शकते.