टिप्स-ट्रिक्स घरातील मुंग्या मिनिटांत कायमच्या कश्या पळवून लावायच्या
घरात मुंग्या झाल्याकी आपण परेशान होतो. कारणकी ते आपले अन्न खराब करतात, किंवा बेडवर येतात किंवा किचन ओट्यावर येतात. मग आपल्याला किचन ओट्या जवळ काम करणे मुश्किल होते.
The text How to get rid of Ants From Kitchen in Marathi be seen on our You tube Chanel How to get rid of Ants From Kitchen
घरातील म्हणजेच किचन मधील मुंग्या कायमच्या कश्या घालवायच्या त्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स आहेत. आपण जर आचरणात आणल्या तर नक्की त्याचा फायदा होईल. हे सर्व सोपे घरगुती उपाय आहेत.
घरातील मुंग्या मिनिटांत पळवून लावायच्या सोप्या ट्रिक्स:
१. एका बाउलमध्ये बेकिंग सोडा व पिठीसाखर समप्रमाणात घेऊन ती मिक्स करून जेथे मुंग्या झाल्या आहेत तेथे बाटलीच्या झाकणात ठेवावी. त्याच्या वासानी मुंग्या लगेच जातात.
२. अजून एक सोपा उपाय म्हणजे जेथे मुंग्या आहेत तेथे हळद टाकावी त्यामुळे सुद्धा मुंग्या लगेच जातात.
३. आपल्या घरात व्हेनिगर असते. व्हेनिगर व पाणी मिक्स करून ते मिश्रण जेथे मुंग्या आहेत तेथे टाकावे व्हनिगरचा उग्र वास त्यांना सहन होत नाही.
४. जर घरात लाल मुंग्या असतील तर व्हेनिगर व बेकिंग सोडा मिक्स करून जेथे मुंग्या आहेत तेथे टाकावे लगेच निघून जातील.
५. आपल्या घरात लिंबू असते तर लिंबाचे साल तुकडे करून टाकावे. त्याच्या उग्र वासाने लाल मुंग्या लगेच निघून जातात.
६. आपण पुदिना आणतो. तर तो सुकवून त्याची पावडर करून जेथे मुंग्या आहेत तेथे टाकावी. पुदिनाचा वास मुंग्याना आवडत नाही.
७. जेथे मुंग्या आहेत तेथे कपूर जो आपण पूजे साठी वापरतो तो ठेवावा त्याच्या वासानी मुंग्या जातात व घरातील नकारात्मक ऊर्जा सुद्धा निघून जाते. कपूरचा उग्र वास मुंग्याना आवडत नाही.
८. तमाल पत्र आपल्या घरात असतेच आपण ते मसालासाठी वापरतो. तमाल पत्र आपण डाळी किंवा साखर मध्ये टाकावे त्यामुळे मुंग्या येत नाहीत. किंवा किचन मधील कपाटात ठेवावे.
९. लवंग आपल्या घरात असतेच लवंग चा खूप उग्र वास येतो. जेथे मुंग्या आहेत तेथे २-३ लवंग ठेवावे. जर साखरेच्या डब्यात मुंग्या येत असतील तर त्यामध्ये पण लवंग टाकावे.
१०. बोरॅक्स पावडर जी आपल्या कडे कॅरम बोर्ड खेळण्यासाठी वापरतात ती व थोडेसे पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवून एका झाकणात ठेवावी त्याच्या वासानी मुंग्या कायमच्या निघून जातात.