घरात बेलपत्रचे रोप लावण्याचे फायदे | लावण्याचा दिवस | योग्य दिशा | बेलपत्र कधी तोडू नये
ज्या घरात बेलपत्रचे झाड असते तेथे नेहमी शिवजिनची कृपा असते. बेलपत्र भगवान शिवजी ह्यांना अति प्रिय आहे.
घरात बेलपत्रचे झाड लावण्याचे फायदे:
भगवान शिवजीची पूजा अर्चा आराधना करण्याचा महिना म्हणजे श्रावण महिना होय. ह्या वर्षी 14 जुलै 2023 पासून श्रावण महिना सुरू होत आहे. शिव पूजा मध्ये बेलपत्रचे विशेष महत्व आहे. ज्या घरात बेलपत्रचे झाड लावतात तेथे शिवजिनची कृपा नेहमी राहते. त्याच बरोबर घरात लक्ष्मी माताचा वास राहतो. घरामध्ये झाडे लावताना ती योग्य त्या ठिकाणी व व्यवस्थित लावावी त्यामुळे आपल्या समस्या दूर होऊ शकतात. शिव पुराणा नुसार घरात ज्या स्थानावर बेलपत्रचे रोप लावले की ती जागा काशी तीर्थच्या समान पवित्र व पूजनीय जागा होते.
The text Bel Patra Tree Benefits, Day & Direction in Marathi be seen on our You tube Chanel Bel Patra Tree Benefits, Day & Direction
आता आपण पाहूया बेलपत्रचे रोप लावण्याचे फायदे काय आहेत.
दरिद्रता पासून मुक्ती:
दरिद्रता दूर करण्यासाठी घरात बेलपत्रचे रोप लावावे. त्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. व ध्यान-धान्यनी आपले भंडार भरलेले राहते. बेलपत्रचे पान आपन आपल्या ध्न स्थानावर ठेवू शकतो. त्यामुळे भरभराट होऊन बरकत होते. आर्थिक संपन्नताच्या साठी उत्तर-दक्षिण ह्या दिशेला लावावे.
वाईट कर्माचा प्रभाव:
शिव पुराणच्या अनुसार घरात बेलपत्रचे रोप लावण्याने व्यक्तीच्या वाईट कर्माचा प्रभाव नष्ट होतो. व त्याच बरोबर घरातील व्यक्तिना अक्षय पुण्यची प्राप्ती होते.
ऊर्जावान राहण्यासाठी:
असे म्हणतात की बेलपत्रच्या रोपाच्या मुळाशी माता गिरिजा, तना मध्ये माता माहेश्वरी, फांद्यामद्धे माता दक्षायनी, पानामद्धे माता पार्वती, फुलांमद्धे माता गौरी व फळामध्ये कात्यायनीचा वास असतो. शास्त्रा नुसार घरातील उत्तर पश्चिम दिशेला बेलाचे रोप लावल्यानी घरातील सदस्य अधिक तेजस्वी व ऊर्जावान बनतात.
टोने टोटकेचा असर होत नाही:
घराच्या अंगणात बेलाचे झाड लावल्याने वाईट शक्तिचा घरात प्रवेश होत नाही. ते तंत्र बाधा असतील तर त्यापासून मुक्ती मिळते व परिवारातील सदस्यांची रक्षा होते. त्यामुळे सकारात्मक ऊर्जाचा संचार होतो.
चंद्र दोष असेलतर छुटकारा मिळतो:
घरात बेलपत्रचे रोप लावल्यानी आपल्याला चंद्र दोष व दुसऱ्या कोणत्या सुद्धा दोषा चा अशुभ प्रभाव सोसावा लागत नाही.
बेलपत्रचे रोप घरात केव्हा लावावे?
बेलपत्र ह भगवान शिवजीना अतिप्रिय आहे. जर आपण आपल्या घरामध्ये सोमवार ह्या दिवशी बेलपत्रचे रोप लावतो तर ते खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की सोमवार ह्या दिवशी बेलपत्रचे रूप लावणे किंवा सोमवारच्या दिवशी बेलपत्रच्या रोपाचे दर्शन घेतल्याने भगवान शिव प्रसन्न होतात व ते आपल्याला अनेक आशीर्वाद देतात.
बेलपत्रचे रोप घरामध्ये कोणत्या दिशेला लावावे?
शास्त्रा नुसार घरातील उत्तर पूर्व ह्या दिशेला बेलपत्रचे रोप लावावे त्यामुळे घरातील सदस्य तेजस्वी व ऊर्जावान बनतात. घरातील अंगणात ही रोप लावल्याने वाईट शक्ति घरात प्रवेश करीत नाहीत. कोणत्या सुद्धा वाईट शक्तिचा परिणाम होत नाही व रक्षा मिळते.
सोमवारी बेलपत्र का तोडू नये?
खर म्हणजे सोमवार ह्या दिवशी बेलपत्र कधी सुद्धा तोडू नये. असे म्हणतात की सोमवारी बेलपत्र तोंडल्याने शिवजीनची कृपा प्राप्त होत नाही. तसेच महिन्यातील चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी व अमावस्या व संक्रांति ह्या तिथीलासुद्धा बेलपत्र तोडू नये.
Disclaimer: आम्ही ही माहिती फक्त आपल्या पर्यन्त पोचवण्यासाठी देत आहोत. त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही देत नाही.