एकादशी स्पेशल साबूदाणा बिना भिजवता कमी तेलकट नाश्ता अगदी १५ मिनिटात
उपवास म्हंटले की आपण निरनिराळे पदार्थ बनवतो. साबूदाणा भिजवून आपण खिचडी किंवा वडे बनवतो. ही दोन्ही पदार्थ स्वादिष्ट लागतात.
आपण साबूदाणा नभिजवता त्याचे वडे किंवा नाश्ता बनवला आहे का? बनवून बघा खूप छान टेस्टि लागतो तसेच बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. साबूदाणा वडा बनवताना साबूदाणा भिजवायचा नाही तसेच बटाटा सुद्धा उकडून घालायची गरज नाही. अगदी छान निराळी पद्धत आहे.
आता दोन दिवसांवर एकादशी आली आहे तर झटपट 10 मिनिटात अश्या प्रकारचा नाश्ता बनवा अश्या पद्धतीने नाश्ता बनवला तर तेल सुद्धा कमी लागते.
साबूदाणा नभिजवता अगदी कमी तेलात नाश्ता कसा बनवायचा त्याच्या शॉर्ट विडियो पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता: साबूदाणा नभिजवता नाश्ता
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 15 वडे बनतात
साहित्य:
१ कप साबूदाणा
१ मध्यम आकाराचा बटाटा
२-३ हिरव्या मिरच्या
३ टे स्पून शेंगदाणा कूट
१ टी स्पून जिरे
थोडीशी कोथिंबीर
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
कृती:
एका कढईमध्ये साबूदाणा २-३ मिनिट भाजून घ्या. शेंगदाणे भाजून साल काढून कूट करून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. बटाटा धुवून, सोलून त्याचे तुकडे करून पाण्यात घालून ठेवा.
मग मिक्सरच्या भांड्यात साबूदाणा ग्राईड करून घ्या. मग मिक्सरच्या भांड्यात साबुदाणा वाटुन झाला की त्यामध्ये चिरलेला बटाटा, हिरवी मिरची घालून परत एकदा वाटुन घ्या वाटताना थोडेसे पाणी घाला. पण मिश्रण पातळ होता कामा नये साधारण पणे १/२ वाटी पाणी घाला.
आता वाटलेले मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये शेंगदाणा कूट, मीठ, कोथिंबीर, जिरे घालून मिक्स करून वाटलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे लांबट गोळे बनवा.
कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले गरम झालेकी छान कुरकुरीत गोल्डन रंगावर वडे तळून घ्या.
साबूदाणा वडे तळून झाल्यावर चटणी बरोबर सर्व्ह करा.