संडे स्पेशल लजीज एग् | लजीज अंडा रेसीपी
Laziz Eggs Laiz Anda Recipe n Marathi
आपण ह्या अगोदर अंड्याच्या बऱ्याच रेसिपी पहिल्या आहेत. आता अजून एक छान अंड्याची रेसिपी आहे. लजीज एग बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. तसेच खूप स्वादिष्ट लागते.
लजीज अंडी आपण घरात अचानक कोणी पाहुणे आलेतर झटपट बनवू शकतो. तसेच ह्यामध्ये मसाला वाटण्याची झंझट नाही. जर आपल्याला लजीज एग पातळ आमटी सारखे पाहिजे असेलतर थोडे जास्त पाणी घालू शकता नाहीतर थोडे पाणी घालून घट्टसर सुद्धा बनवू शकता.
The text Laziz Eggs Laiz Anda Recipe in Marathi be seen on our You tube Chanel Laziz Eggs Laiz Anda
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ३ जणसाठी
साहित्य:
३ अंडी
2 टे स्पून तेल
३ लवंग
१” दालचीनी
१ तमालपत्र
१ टी स्पून जिरे
२ मोठे कांदे (चिरून)
२ मोठे टोमॅटो
२-३ हिरव्या मिरच्या
१०-१२ काजू
१ टे आल-लसूण
१ टी स्पून काश्मिरी लाल मिरची
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून धने-जिरे पावडर
१/२ टी स्पून कसूरी मेथी
१/२ टी स्पून चाट मसाला
मीठ चवीने
२ टे स्पून कोथिंबीर (चिरून)
कृती: प्रथम कांदा, कोथिंबीर चिरून घ्या. टोमॅटो व हिरवी मिरची मिक्सर मध्ये वाटुन घ्या. आल-लसूण पेस्ट करून घ्या.
एका पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लवंग, दालचीनी, तमालपत्र, जिरे घालून चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये आल-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. आता त्यामध्ये टोमॅटो पयूरी घालून तेल सुटे पर्यन्त परतून घ्या. मग त्यामध्ये काश्मिरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने-जिरे पावडर व मीठ घालून मिक्स करून घ्या.
मग त्यामध्ये अर्धा कप पाणी, कसूरी मेथी व चाट मसाला घालून मिक्स करून झाकण ठेवून मंद विस्तवावर ५ मिनिट मसाला शिजू द्या. मग झाकण काढून परत १/२ कप पाणी घालून गरम झाल्यावर जेथे पाण्याचे बुडबुडे येतात तेथे अंडे फोडून घाला सर्व अंडी घातल्यावर झाकण ठेवून ५ मिनिट अंडे शिजू द्या.
आता अंडी शिजली असतील तर झाकण काढून गरम गरम लजीज अंडी मिल्क पराठा बरोबर सर्व्ह करा.