मासिक पाळी चालू असताना केस धुवावे की नाही?
आपल्याला आठवते का आपली आई किंवा आजी आपल्याला लहानपणी नेहमी म्हणायची की मासिक पाळी चालू असताना केस धुवू नयेत. काही लोक त्याला अंधश्रद्धा असे सुद्धा म्हणतात. मासिक पाळी मध्ये केस धुवू नयेत ह्याची काही वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत. असे सुद्धा म्हणतात की मासिक पाळीमध्ये केस धुतल्यानी गर्भाशयात रक्ताच्या गाठी होऊ शकतात.
The text Masik Pali Chalu Astana Kes Dhuvave Ki Nahi? in Marathi be seen on our You tube Chanel Masik Pali Chalu Astana Kes Dhuvave Ki Nahi?
आज आपण मासिक पाळी मध्ये केस धुतल्यानी काय होऊ शकते ते आपण पाहू या.
मासिक पाळी ही 3 दिवस, 5 दिवस किंवा 7 दिवसाची सुद्धा असू शकते. मासिक पाळी मध्ये रक्त स्त्राव हा मोकळे पणाने होणे गरजेचे असते. त्यामुळे शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर पडते त्यामुळे अशुद्ध रक्ताचा स्त्राव होताना शरीर उबदार असणे गरजेचे असते.
पूर्वीच्या काळी मासिक पाळी चालू झाली की मुलींना बाजूला बसायला सांगायचे त्याचे कारण की विश्रांती मिळावी. खर म्हणजे मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे. ही आपल्याला माहिती आहेच. त्याच्या बाबतीत काही समज किंवा गैरसमज सुद्धा आहेत.
मासिक पाळी चालू झाली की पहिले 3 दिवस महत्वाचे असतात कारण की तेव्हा रक्ताचा फ्लो थोडा जास्त असतो. तसेच पहिले 3 दिवस शरीराचे तापमान हे थोडे जास्त असते. पहिल्या 3 दिवसांत केस म्हणजेच डोके धुतले तर शरीराचे तापमान एकदम कमी होते त्यामुळे स्त्राव नीट होत नाही. मग त्याचा त्रास महिलांना सहन करावा लागतो.
मग स्त्राव नीट झाला नाहीतर इनफेशन होऊ शकते. व त्याच बरोबर पोटात दुखू शकते. तर शक्यतो पहिले 3 दिवस केस धुणे टाळावे समजा केस धुवायचे असतील तर कोमट पाण्यानी केस धुवावे. त्यामुळे शरीराचे तापमान मेंटेन राहते व पोट दुखीच्या वेदना सुद्धा कमी होतात.
टीप: आम्ही ही माहिती फक्त आपल्या माहिती साठी देत आहोत त्यामागे कोणता सुद्धा अंधश्रद्धा नाही. आपल्याला पटले तर पहा.