टेस्टि क्रिस्पि मसाला वडा | चटम वडा रेसीपी
मसाला वडा हा चनाडाळ व मसाले वापरुन तळलेली कुरकुरीत व चमचमीत डिश आहे. जी दक्षिण भारतातील एक लोकप्रिय डिश आहे.
मसाला वडा मध्ये चनाडाळ बरोबर अजून काही साहित्य वापरले आहे ते म्हणजे कांदा त्यामुळे वडा छान टेस्टि लागतो. जर आपल्याला कांदा व बडीशेप वापरल्यामुळे छान चव येते.
आता पावसाळा हा सीझन आला आहे त्यासाठी मसाला वडा ही डिश मस्त आहे. गरम गरम मसाला वडा टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकता.
The text Tasty Crispy Masala Vada South Indian Style in Marathi be seen on our You tube Chanel Tasty Crispy Masala Vada
मसाला वडा बनवताना काही टिप्स लक्षात घेतल्या पाहिजेत. मसाला वडा बनवताना चनाडाळ अगोदर 4-5 तास पाण्यात भिजत घाला. चनाडाळ वाटताना पाणी वापरू नका जर जरूरत पडली तरच 1-2 टे स्पून पाणी घाला कारण की वड्याचे मिश्रण पातळ होता कामा नये. तांदळाचे पीठ घतल्यामुळे वड्याला छान बाईडिंग होते. कडीपत्ता घातल्यामुळे छान सुगंध येतो व टेस्ट सुद्धा चांगली येते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 15-18 वडे बनतात
साहित्य:
1 कप चनाडाळ
1 छोटा कांदा (चिरून)
4-5 हिरव्या मिरच्या
7-8 लसूण पाकळ्या
1 टी स्पून बडीशेप
1 टी स्पून लाल मिरची पावडर
1/4 टी स्पून हिंग
1/4 टी स्पून हळद
2 टे स्पून कोथिंबीर (चिरून)
8-10 कडीपत्ता पाने
2 टे स्पून तांदळाचे पीठ
मीठ चवीने
तेल मसाला वडा तळण्यासाठी
कृती:
प्रथम चनाडाळ धुवून 3-4 तास पाण्यात भिजत ठेवा. कांदा, कोथिंबीर चिरून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात चनाडाळ घेऊन त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, बडीशेप, 2 टे स्पून पाणी घालून जाडसर वाटून घ्या.
मग वाटलेले मिश्रण एक बाउलमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला कांदा,
कोथिंबीर, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ, कडीपत्ता पाने, तांदळाचे पीठ व मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्याचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून घ्या.
कढईमध्ये तेल चांगले गरम करून त्यामध्ये 3-4 गोळे सोडून छान ब्राऊन रंगावर कुरकुरीत तळून घ्या.
गरम गरम मसाला वडे चटणी किंवा सॉस बरोबर सर्व्ह करा.