3 जुलै सोमवार गुरु पूर्णिमा 2023 तिथी, महत्व, उपाय व मंत्र
हिंदू धर्मामध्ये गुरु पूजनला फार महत्व असते. आषाढ महिन्यातील पूर्णिमा ह्या तिथीला गुरु पूर्णिमा साजरी करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी गुरु पूजन केलेतर जीवनात सुख-समृद्धी प्राप्त होते.
The text 3 July Guru Purnima 2023 Tithi KA Mahatva in Marathi be seen on our You tube Chanel 3 July Guru Purnima 2023 Tithi KA Mahatva
धार्मिक मान्यता अनुसार गुरु पूर्णिमा ह्या दिवशी गुरूंचा आशीर्वाद जरूर घ्यावा. तसेच ह्या दिवसाला व्यास पूर्णिमा सुद्धा म्हणतात. कारण की ह्यादिवशी महर्षि वेदव्यास ह्यांचा जन्म झाला होता. ज्यांनी महाकाव्य महाभारत ची रचना केली होती.
गुरु पूर्णिमा कधी साजरी करायची:
हिंदू पंचांग नुसार आषाढ शुक्ल पक्ष पूर्णिमा तिथी प्रारंभ 2 जुलै रात्री 8 वाजून 21 मिनिट
पूर्णिमा समाप्ती 3 जुलै संध्याकाळी 5 वाजून 8 मिनिट पर्यन्त त्यामुळे गुरु पूर्णिमा 3 जुलै सोमवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी ब्रह्म योग व इन्द्र योग येत आहे त्यामुळे ज्योतिष शास्त्रा नुसार खूप शुभ मानले जाते.
गुरु पूर्णिमाचे महत्व:
सनातन धर्मामध्ये जसे गुरु शंकराचार्य, श्री रामानुजाचार्य व श्री माधवाचार्य ह्यांना जगद्गुरुचे स्थान प्राप्त झाले आहे व गुरु पूर्णिमा ह्या दिवशी त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तसेच बौद्ध व जैन धर्ममध्ये सुद्धा गुरु पूर्णिमा साजरी केली जाते. ह्या दिवशी बौद्ध धर्माचे गुरु महात्मा गौतम बुद्धची उपासना केली जाते व जैन धर्म मध्ये भगवान महावीर ह्याना गुरुच्या रूपात पूजले जाते.
गुरु पूर्णिमा ह्या दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र मधील पुणे येथून शिर्डी येथे साई बाबांचे भक्त श्री साई बाबांची पालखी चालत घेऊन जातात व गुरु पूर्णिमा ह्या दिवशी श्री साई बाबांची श्रद्धेने पूजा अर्चा करून त्यांचा आशीर्वाद घेतात.
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास मनोभावे गुरूंची पूजा अर्चा केली तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी पुढे दिलेले उपाय केले तर आपल्या कुंडलीमधील गुरु दोष समाप्त होऊन त्याच बरोबर नोकरी, ध्यान, संतान सुख व विवाह मध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.
आर्थिक लाभासाठी:
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णुह्यांची कथा आईकल्याने व विधी पूर्वक भगवान विष्णु ह्यांचे मंत्रजाप केल्याने आर्थिक तंगी दूर होईल.
कारोबार मध्ये वृद्धी:
गुरु पूर्णिमा ह्या दिवशी भगवान बृहस्पति ह्यांना पिवळ्या रंगाचे वस्त्र अर्पित करा. ॐ बृहस्पतए नम: हा मंत्र जाप करा. त्यामुळे व्यापारात वृद्धी होऊन थांबलेली काम होतील.
संतान प्राप्ती:
ज्योतिष शास्त्रा नुसार आपल्या कुंडली मधील गुरु ग्रह जर कमजोर असेलतर संतान प्राप्ती होण्या मध्ये अडचणी येऊ शकतात. त्यामुळे गुरु पूर्णिमा ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना पिवळे केशर अर्पित करा व जरूरत मंद लोकांना मदत करा.
विद्यार्थीनी करा हा उपाय:
आपल्या शिक्षनात अडचणी येत असतील तर गुरु पूर्णिमा ह्या दिवशी ” ॐ ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नम: हा मंत्र जाप करा. असे केल्याने मुलांचे भविष्य सुधारते व त्याच्या जीवनात सुख संपत्ति येते.
डिसक्लेमर: ह्या लेखात दिलेली माहिती आम्ही फक्त आपल्या पर्यन्त पोचवत आहोत त्याची कोणती सुद्धा पुष्टी आम्ही देत नाही.