झटपट 10 मिनिटांत अनारसे तांदूळ नभिजवता गूळ घालून
आता अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यामध्ये घरी जावयाला बोलवतात. मग मुलीची लक्ष्मी म्हणून व जावयाची विष्णु भगवान म्हणून पूजा करून त्यांना 33 अनारसे देण्याची पद्धत पूर्वी पासून आहे.
The text Zatpat Delicious Adhik Mass Special Anarase In 10 Miniutes in Marathi be seen on our You tube Chanel Special Anarase
अनारसे म्हंटले की 3 दिवस तांदूळ भिजत घालायचे मग गूळ घालून केळ लाऊन बाजूला ठेवून मग त्याचे अनारसे बनवायचे त्यासाठी वेळ पण लागतो. आता नोकरी व कामा मुळे ही सर्व करायला वेळ मिळत नाही. मग आपण बाजारातून विकत आणतो.
आज आपण इन्स्टंट अनारसे कसे बनवायचे ते पहाणार आहोत. त्यासाठी तांदूळ भिजवायची गरज नाही. अनारसे बनवण्यासाठी बाजारात तांदळाचे पीठ मिळते ते वापरले आहे व गूळ घालून अगदी बाजारात मिळतात तसेच अनारसे बनवले आहेत.
बनवण्यासाठी वेळ:
पीठ भिजवायल वेळ: 10 मिनिट
अनारसे करण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 12 बनतात
साहित्य:
1 वाटी तांदळाचे पीठ (मध्यम आकाराची)
1 वाटी गूळ (किसून किंवा चिरून)
1 टी स्पून वेलची पावडर
2 टे स्पून तूप किंवा दूध
1 टे स्पून खसखस
1 टे स्पून तीळ
तेल किंवा तूप अनारसे तळण्यासाठी
कृती: एका बाउलमध्ये तांदळाचे पीठ घ्या. गूळ चिरून किंवा किसून घ्या.
मिक्सरच्या भांड्यात तांदळाचे पीठ व निम्मा गूळ घेऊन ब्लेंड करून घ्या. मग बाकीचा राहिलेला गूळ घालून परत ब्लेंड करून घेऊन एका बाउलमध्ये मिश्रण काढून घ्या. मिश्रण कोरडे वाटले तर लागेल तसे तूप किंवा दूध 1 टे स्पून टाकून मिक्स करून घ्या. लागले तर परत 1 टे स्पून परत घालून चांगले मळून घ्या.
आता मिश्रणाची एक वळकुटि बनवून सुरीने कापून त्याचे तुकडे करून घ्या. एक गोळा घेऊन थोड्याश्या खसखस वर थापुन घ्या. दूसरा गोळा घेऊन तिळांवर थापुन घ्या.
पसरट कढई मध्ये तेल किंवा तूप गरम करून घ्या, मग मंद विस्तवावर छान गुलाबी रंगावर अनारसे तळून घ्या. तेलात अनारसा सोडला की त्यावर झाऱ्यानी तेल शिंपडत जा म्हणउजे अनारसा आतून कचा राहणार नाही. अनारसा तळून झालाकी ताटात बाजूला उभे करून ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईन. अश्या प्रकारे सर्व अनारसे तळून घ्या.
थंड झाल्यावर प्लॅस्टिक पिशवीत ठेवून घट्ट झकणाच्या डब्यात ठेवा. लागेल तसे काढून सर्व्ह करा.