29 जुलै अधिक मास पद्मिनी (कमला) एकादशी पूजा मुहूर्त, महत्व, कथा व उपाय
पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी ही अधिक मासमध्ये येते. अधिक महिन्याची सुरुवात 18 जुलै ला सुरू झाली आहे व 16 ऑगस्ट ला समाप्ती होत आहे. त्यालाच पुरुषोत्तम मास असे सुद्धा म्हणतात.
अधिक महिन्यातील एकादशीचे महत्व जास्त असते. कारण की ह्या महिन्याचे स्वामी श्री हरी विष्णु आहेत व एकादशी तिथी त्यांना समर्पित आहे. म्हणून ह्या दिवशी संपूर्ण दिवस उपवास केल्यास डबल फळ प्राप्त होते. तसेच व्रत केल्याने पूर्ण वर्षाच्या एकादशी चे व्रत केल्याने पुण्य मिळते. तीन वर्षात येणारी एकादशी ही खास आहे. कारणकी अधिक मास व एकादशी ही दोन्ही भगवान विष्णु ह्यांना प्रिय आहेत.
पद्मिनी एकादशी किंवा कमला एकादशी तिथी मुहूर्त व महत्व:
पद्मिनी एकादशी 2023 तिथि:
पंचांग नुसार अधिक श्रावण महिन्यातील शुक्ल पक्ष एकादशी तिथी
28 जुलै 2023 शुक्रवार दुपारी 2 वाजून 51 मिनिट सुरुवात
29 जुलै शनिवार 1 वाजून 5 मिनिट समाप्ती
तिथी नुसार शनिवार 29 जुलै 2023 ह्या दिवशी व्रत करावे
पद्मिनी एकादशी 2023 पूजा मुहूर्त:
29 जुलै पूजा मुहूर्त सकाळी 7 वाजून 22 मिनिट पासून सकाळी 9 वाजून 4 मिनिट पर्यन्त
दुपारी 12 वाजून 27 मिनिट पासून 5 वाजून 33 मिनिट पर्यन्त
पद्मिनी एकादशी व्रत विधि:
पद्मिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवना अर्ध द्या.
भगवान विष्णु ह्यांना पाणी व केशर मिक्स करून अभिषेक करा.
मग भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चा करा.
एकादशीच्या दिवशी भगवान विष्णु ह्यांचा बरोबर माता लक्ष्मी ची पूजा अर्चा करा.
पूजेमद्धे पिवळ्या रंगाचे फूल, धूप, दीप, अक्षता, चंदन, व दूर्वा अर्पित करा.
ब्राह्मण ला फलाहार व भोजन द्या किंवा दक्षिणा द्या.
ह्या दिवशी एकादशी व्रत कथा आइका.
भगवान विष्णु ह्यांचे भजन व मंत्र जाप करा.
विष्णु सहस्त्रनामचे पठन करा.
एकादशीचे व्रत दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सोडतात.
पद्मिनी एकादशी व्रत गौ दान समान फळ देते शास्त्रा नुसार गौदान केल्याने मृतू नंतर यमलोक च्या यातना भोगाव्या लागत नाहीत.
पुराणा मध्ये प्रतेक एकादशी ही कथा सांगितली आहे. असे म्हणतात की पद्मिनी एकादशी च्या दिवशी कथा आईकल्या शिवाय व्रत पूर्ण होत नाही.
पद्मिनी एकादशी कथा:
पौराणिक कथा अनुसार त्रेयायूग मधील महिषमती पुरी चे राजा कीतृवीर्य आपल्या एक हजार पत्नीन बरोबर राहत असे. राजा कडे संतान नव्हती म्हणून राजा खूप चिंतेत होता. कारणकी त्याच्या नंतर राज्य कारभार कोण चालवणार. संतान प्राप्ती साठी त्यांनी खूप प्रयत्न केले मग राजा कृतवीर्य वनांत जाऊन तपस्या करण्याचे ठरवले.
मग राजा बरोबर पद्मिनी राणी सुद्धा वनात जाण्यासाठी निघाली. मग दोघे तपस्वी चा वेश परिधान करून गंधमान पर्वतावर तप करण्यासाठी गेले. बरेच वर्ष तप करून सुद्धा त्याना संतान प्राप्ती झाली नाही. मग राणी पद्मिनीनी माता अनसूया ला काय उपाय करायचा ते विचारले.
मग माता अनसूया म्हणाली दर तीन वर्षानी अधिकमास येतो तो मनोकामना पूर्ती करणारा महिना आहे. अधिकमास मधील शुक्ल पक्ष एकादशी ह्या दिवशी व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात.
मग राणीने सर्व विधी पूर्वक एकादशी व्रत केले मग भगवान विष्णु ह्यांनी संतान सुखचे वरदान दिले. मग काही दिवसांनी पुत्र प्राप्ती झाली. मग त्याचे नाव कृतवीर्य अर्जुन असे ठेवले. मग पुढे हा मुलगा खूप पराक्रमी राजा झाला. त्यांनी रावणाला सुद्धा युद्धा मध्ये हरवून त्याला बंदी बनवले होते.
पद्मिनी एकादशी करावयाचे उपाय:
* भगवान विष्णु व माता लक्ष्मीला बडीशेप अर्पित केल्याने व्यवसाया मध्ये वृद्धी होईल.
* गरीब लोकाना भोजन द्या. त्यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल.
* खीरचा भोग दाखवताना तुळस टाकून दाखवा त्यामुळे विवाहिक जीवन सुखी समाधानी होईल.
* नऊ मुखी तुपाचा दिवा लावावा त्यामुळे नोकरीत येणाऱ्या अडचणी दूर होतील.
* दान दक्षिणा दिल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतील.
*भगवान विष्णु ह्यांच्या समोर तुपाचा दिवा पूर्व दिशेला तोंड करून लावून गीता मधील 11 वा अध्याय वाचवा. त्यामुळे आपले अडकलेले पैसे मिळतील.
* संध्याकाळी तुळशीच्या समोर दिवा लावावा व ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: हा मंत्र जाप करावा.
* पिपळच्या झाडाची पूजा केल्यास भगवान विष्णु ह्यांची कृपा मिळते.