श्रावण महिन्याची सुरुवात कधी, सोमवार कीती, दोन महीने श्रावण?
श्रावण महिना शास्त्रामध्ये खूप खास मानला जातो. असे म्हणतात की श्रावण महिना भगवान शिव व माता गौरी ह्यांना अतिप्रिय आहे. ह्या महिन्यातील सोमवार ह्या दिवसाला विशेष महत्व आहे.
The text Shravan Maas 2023in Marathi be seen on our You tube Chanel Shravan Maas 2023
श्रावण महिना भगवान शिव ह्यांना समर्पित असतो. त्यालाच श्रावण मास असे सुद्धा म्हणतात. शास्त्रा मध्ये ह्या महिन्याला खूप महत्व आहे. ह्या महिन्यांत भगवान शिव ह्यांची विशेष पूजा अर्चा केली जाते व श्रावणी सोमवारचे उपवास करतात. तसेच ह्या महिन्यात कांवडा यात्रा सुद्धा निघते.
पण ह्यावर्षी श्रावण महिना एक नाहीतर दोन महीने आहे. ह्यावर्षी अधिक महिना असल्यामुळे श्रावण महिना दोन महीने आहे. ह्यावर्षी श्रावण महिना जुलै पासून सुरू होऊन सप्टेंबर मध्ये समाप्त होत आहे. आता आपण पाहूया श्रावण महिन्यातील खास बाते.
श्रावण महिना केव्हा पासून सुरू होत आहे?
अधिक श्रावण महिना ह्या वर्षी 18 जुलै पासून सुरू होत असून 16 ऑगस्ट पर्यन्त आहे.
श्रावण महिना 17 ऑगस्ट पासून सुरू होत असून 15 सप्टेंबर पर्यन्त आहे. त्यामुळे श्रावण 58 दिवसांचा आहे. हा दुर्लभ संयोग 19 वर्षा नंतर येत आहे.
4 का 5 नाहीतर ह्या वर्षी श्रावणी सोमवार 8 आहेत.
श्रावण महिन्यात सोमवारच्या व्रताचे महत्व आहे दर वर्षी 4 ते 5 श्रावणी सोमवार असतात पण ह्या वर्षी 4 किंवा 5 सोमवार नसून 8 सोमवार आहेत. ह्या वर्षी सोमवार 24 जुलै, 31 जुलै, 7 ऑगस्ट, 14 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, 28 ऑगस्ट, 4 सप्टेंबर व 11 सप्टेंबर अश्या तारखा आहेत.
श्रावण महिन्याचे महत्व:
श्रावण महिना भगवान शिव ह्यांचा आवडतीचा महिना आहे. ह्या महिन्यात भगवान शिव ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा केल्यास भगवान शिव लवकर प्रसन्न होतात व आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात म्हणून पूर्ण श्रावण महिन्यात त्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा करावी.
भगवान शिव ह्यांना श्रवण महिना अतिप्रिय का?
असे म्हणतात की दक्ष पुत्रि सती ने आपले प्राण सोडले होते तेव्हा महादेव दुखी झाले होते व ते घोर तप करण्यामध्ये लीन झाले होते. तेव्हा माता सती ने पर्वतराज हिमालय पुत्रि पार्वती च्या रूपात जन्म घेतला व महादेव ह्यांना पतीच्या रूपात मिळण्यासाठी कठोर तप केले. माता पार्वतीची घोर तप स्या पाहून महादेव ह्यांनी पार्वतीची मनोकामना पूर्ण करून महाशिव रात्रीच्या दिवशी माता पार्वती बरोबर विवाह केला. म्हणून श्रावण महिना हा महादेव व माता पार्वती ह्यांचा मिलनाचा महिना म्हणून मानला जातो. म्हणूनच भगवान शिव व माता पार्वती ह्यांना हा महिना खूप प्रिय आहे.