वास्तु टिप्स: घरामध्ये झाडू, कात्री, चाकू व पायपुसणे ह्या छोट्या छोट्या ठेवण्याची योग्य जागा
आपल्या घरातील प्रतेक वस्तूचे एक विशेष महत्व आहे व त्याचे काही काम सुद्धा आहे. ह्या वस्तु आपल्याला समृद्धी व संपन्नता मिळवून देतात तसेच ह्या वस्तु घरात असल्याने माणसाचे भाग्य सुद्धा बदलते. पण त्याचा दुरुपयोग केल्याने आपल्या परेशानी सुद्धा वाढवू शकतात.
The text Vastu Tips: Gharamadhe Jadu, Katari, Chaku w Paypusni Thevnyachi Yogya Jaga in Marathi be seen on our You tube Chanel Vastu Tips: Gharamadhe Jadu, Katari, Chaku w Paypusni Thevnyachi Yogya Jaga
आपल्या छोट्या छोट्या वस्तूंनीच आपले घर बनत असते. घरातील प्रतेक वस्तु ही महत्वाची व उपयोगी असते. पण त्याचा योग्य वापर झाला पाहिजे नाहीतर ह्याच वस्तु माणसाला कंगाल बनवायला सुद्धा बनवू शकतात.
आज आपण घरातील ह्या छोट्या छोट्या वस्तु कश्या भाग्यदायक आहते ते आपण पाहू या.
झाडू:
झाडू ला आपण लक्ष्मीचे रूप मानतो तसेच आपल्या आर्थिक स्थितिशी त्याचा संबंध आहे. झाडू चा अनादर करणे किंवा पाय लागणे, फेकणे किंवा घरात तुटलेला झाडू ठेवणे म्हणजे आपली आर्थिक तंगी ला दुजोरा देणे. वास्तु शास्त्रा नुसार झाडूला नेहमी लपवून ठेवावा. म्हणजे दुसऱ्या कोणाच्या नजरेज नाही पडला पाहिजे. झाडू ठेवताना नेहमी आपण जी बाजू पकडती ती खालच्या बाजूला ठेवावी. सूर्यास्त च्या वेळी व सूर्यास्तच्या नंतर लगेच झाडू मारणे म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा व दारिद्रताचा अभाव होतो.
कात्री:
कात्री ही वस्तु घरातील व्यक्तीचे संबंध टिकवून ठेवण्याची मोठी भूमिका सांभाळते. कात्रीचा चुकीचा वापर घरातील संबंध बिघडवू शकतो. वास्तु शास्त्रा नुसार कात्री नेहमी कागदामध्ये किंवा कापडा मध्ये गुंडाळून ठेवावी म्हणजे घरातील व्यक्तीचे संबंध नेहमी चांगले राहतात. कात्री कधी सुद्धा वरती अशीच उघड्यावर ठेवू नये. आमची आज्जी नेहमी म्हणायची विनाकारण कात्री चालू नये म्हणजे तिचा आवाज करू नये त्यामुळे घरात भांडण होतात. आपल्याला माहीत आहे का कात्री दुसऱ्यांना कधी सुद्धा देवू नये. त्यामुळे आपले संबंध बिघडतात.
चाकू:
घरात राहणारे लोक कशे आहेत व आपल्या संततीची स्थिति कशी असेल ते चाकू बघून देसते. चाकू नेहमी स्वयंपाक घरात उलटा ठेवावा. त्याची धार नेहमी खालच्या बाजूला पाहिजे. त्यामुळे आपल्या संततीची बाजू नेहमी योग्य राहते. बिना धारवाला चाकू किंवा गंज चढलेला चाकू घरातील व्यक्तिचे आरोग्य बिघडवू शकतो. घरात मोठ्या आकाराचा चाकू ठेवण्याने विवाहिक जीवनात त्याचा वाईट परिणाम होतो. जर कोणी व्यक्ति आपल्याला धार वाला चाकू देत असेलतर समजावे की ती व्यक्ति स्वार्थी आहे.
पायदान म्हणजेच पायपुसण:
पायपुसण्यानी घरात आनंदी वातावरण येते तसेच परेशानी सुद्धा येतात. पायपुसणे नेहमी स्वच्छ ठेवावे. पायपुसणे फाटलेले किंवा घाणरडे असू नये. जर पायपुसणे फाटलेले असेलतर घरातील समस्या वाढतात.
पायपुसणे रोज सकाळी साफ करून दारा समोर ठेवावे व देवाला प्रार्थना करावी की आमच्या घरात तुझे आगमन होऊ दे. पायपुसण्यावर स्वस्तिक चिन्ह किंवा शंख नसावा. त्यामुळे घरात आपत्ति येऊ शकते.
घरात ह्या वस्तु कधी सुद्धा ठेवू नयेत:
वास्तु शास्त्रा नुसार घरात चुकून सुद्धा काटे असलेली झाडे, ताजमहाल, रडत असलेले मूल, महाभारत, हिसक प्राणी किंवा युद्धाची फ्रेम लावू नये. घरातील नळ नेहमी चांगले पाहिजेत गळके किंवा खराब असू नयेत. त्याच बरोबर तुटलेली खुर्ची, बंद घडयाळ, किंवा बंद इलेक्ट्रॉनिक वस्तु ह्यामुळे सुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा येते.