कोकणातील हळदीच्या पानातील पातोळ्या नागपंचमी/गणेश चतुर्थीसाठी नेवेद्यसाठी
पातोळ्या हा कोकणमधील लोकप्रिय डिश आहे. पातोळ्या हा पदार्थ नागपंचमी किंवा गणपती उत्सवमध्ये बनवतात.
नागपंचमी ह्या सणाला विस्तवावर तवा ठेवायचा नसतो. त्यामुळे आपण उकड काढून पदार्थ बनवू शकतो. हळदीच्या पानात पातोळ्या बनवल्या तर छान टेस्टि लागतात. त्याचा छान सुगंध सुद्धा येतो.
पातोळ्या बनवताना तांदळाच्या पिठाला उकड काढून मग हळदीच्या पानात सारण भरून स्टीम काढली जाते.
हळदीच्या पानातील पातोळे शॉर्ट विडियो पुढील लिंकवर क्लिक करा: हळदीच्या पानातील पातोळे
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
स्टीमसाठी वेळ: 12-15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
2 कप तांदळाचे पीठ
2 कप ओला नारळ खोवून
1/2 कप गूळ (किसून)
1 टी स्पून वेलची पावडर
1 टे स्पून तूप, तेल
कृती: सारणा करिता: पॅनमध्ये 1 टे स्पून तूप गरम करून घ्या. मग त्यामध्ये ओला नारळ व गूळ घालून मिक्स करून 2-3 मिनिट गरम करून घ्या. मग मिश्रण थोडे कोरडे झालेकी त्यामध्ये वेलची पावडर घालून मिक्स करून मिश्रण थंड होऊ द्या.
आवरणांसाठी: एका जाड बुडाच्या भांड्यात 2 कप पाणी गरम करून त्यामध्ये तूप व मीठ घालून उकळी आलीकी तांदळाचे पीठ घालून लगेच मिक्स करून घ्या. झाकण ठेवून एक वाफ आलीकी विस्तव बंद करून घ्या.
आता उकड एका प्लेटमध्ये काढून घ्या. थोडी थंड झालीकी पाण्याचा हात लाऊन चांगली मळून घ्या.
आपल्याला हळदीच्या पानात पातोळे बनवायचे आहेत तर हळदीची पाने स्वच्छ धुवून 3” – 3” ची कापून घ्या. एक सारखी कापून घ्या.
तांदळाच्या उकडीचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन हातानी हळदीच्या पानावर गोल आकाराचा थापुन घ्या. थापताना बोटाला थोडेसे तेल लावा.
मग त्यावर 1 टे स्पून सारख ठेवून करंजी सारखी मुडपून घ्यावी. मूडपताना पाना सकट मुडपून घ्या. अश्या प्रकारे सर्व पातोंळ्या बनवून घ्या. मग चाळणीवर ठेवून 10-15 मिनिट वाफवून घ्या.
मग गरम गरम पाटोळ्या सर्व्ह करताना हळदीचे पान काढून वरतून तूप घालून द्या.