30 ऑगस्ट 2023 रक्षाबंधन शुभयोग, भद्रामुळे फक्त एकच मुहूर्त संपूर्ण माहिती
30 ऑगस्ट 2023 बुधवार रक्षाबंधन हा सण साजरा करायचा आहे. ह्या दिवशी आयुष्यमान, बुधादित्य, वासी व सुनफा योग आहे. पॅन भद्रकाळ मध्ये फक्त एकच मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर भावाला राखी बांधायची आहे.
रक्षाबंधन ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे लिंकवर क्लिक करून पहा: रक्षा बंधन माहिती
रक्षाबंधन हा सण भाऊ बहीण च्या प्रेमाचा सण आहे. ह्या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला प्रतेक संकटामद्धे रक्षा करण्याचे वाचन देतो व बहीण आपल्या भावाला रक्षासूत्र बांधून त्याच्या दीर्घ आयुष्यसाठी प्रार्थया करते. भाऊ बहिण च्या विश्वासाचा रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यात पूर्णिमा ह्या तिथीला साजरा करतात.
आपण फक्त भावालाच रक्षासूत्र बांधू शकतो का?
जे आपले रक्षण करतात व आपल्याला सुरक्षित ठेवतात त्यांच्या प्रती आभार दर्शवून रकशसूत्र बांधू शकता. भगवान श्री कृष्ण ह्यांनी युधिष्ठर ना सांगितले होते की रक्षा बंधन आपण आपल्या सैन्य बरोबर साजरा करू त्यामुळे पांडव व त्यांच्या सेनेचे रक्षण होईल. रक्षासूत्र मध्ये खूप अद्भुत शक्ति असते. त्यामुळे बहीण आपल्या भावाला राखी बांधते.
रक्षाबंधन शुभ योग किंवा शुभ मुहूर्त:
पूर्णिमा तिथी
30 ऑगस्ट 2023 बुधवार सकाळी 10 वाजून 49 मिनिट पासून 31 ऑगस्ट सकाळी 7 वाजून 6 मिनिट पर्यन्त
रक्षाबंधनच्या दिवशी आयुष्यमान योग, बुधादित्य योग, वासी योग और सुनफा योग सुद्धा आहे.
तसेच ह्या दिवशी सकाळी 10 वाजून 59 पासून रात्री 9 वाजून 2 मिनिट पर्यन्त भद्रा आहे व सकाळी 10 वाजून 19 मिनिट पासून पंचक सुद्धा सुरू होत आहे.
भद्रकाळ मध्ये राखी बांधणे शुभ मानले जात नाही. म्हणून रक्षाबंधन 30 ऑगस्ट भद्रकाळ संपल्यावर रात्री 9 वाजून 2 मिनिट पासून 11 वाजून 13 मिनिट पर्यन्त शुभ मुहूर्त आहे. ह्या दिवशी सर्वात पहिल्यांदा श्री गणेश भगवान ह्यांना राखी अर्पण करा. असे केल्याने अशुभ योग चा असर संपून जातो. ह्या काळात भाऊ व बहीण दूर असतील तर आपल्या भावाच्या दीर्घ आयुष्यसाठी भगवान गणेश किंवा श्रीकृष्ण ह्यांच्या मूर्तीला राखी बांधावी.
रक्षाबंधन पूजाविधी:
श्रावण पूर्णिमाची पूजा करतात पॅन रक्षाबंधनची पूजा करीत नाहीत. ह्या दिवशी भाऊ व बहीण ह्याचे महत्व असते. राखी बांधण्याच्या अगोदर एक पूजा थाळी तयार करावी. त्यामध्ये रोली, चंदन, अक्षता, एक तुपाचा दिवा, नारळ, रक्षासूत्र व मिठाई ठेवा. रक्षा सूत्र व पूजेची थाळी प्रथम आपले इष्ट देवता, कुलदेवता व पितर ह्यांना अर्पित करा मग आपल्या भावाला तिलक लावा. मग उजव्या हाताच्या मनगटावर रक्षासूत्र बाधून ओवाळून मिठाई द्या. ओवाळतान आपल्या भावाच्या दीर्घायुषासाठी प्रार्थना करा व आपल्या भावला सुख समृद्धी प्राप्त होवो म्हणून प्रार्थना करा.
राखी बांधताना भावाचा हात रिकामा ठेवू नका हातात एक नारळ देवून मग राखी बांधा त्यामुळे हात भरलेला राहतो. व त्याच्या मागे एक कारण आहे ते म्हणजे भावाच्या हातात नेहमी लक्ष्मी राहो व माता लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा मिळतो.
राखी बाधताना तीन गाठी मारा. पहिली गाठ दीर्घायुषसाठी, दुसरी गाठ सुख समृद्धीसाठी व तिसरी गाठ नाती मजबूत बनण्यासाठी तसेच त्यावेळी ब्रह्मा, विष्णु, महेश ह्यांचे स्मरण करा.
राखी पूर्णिमा ह्या दिवशी काळे कपडे घालून नका त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होते.
राखी बांधताना भावाचे मुख पूर्व दिशेला व बहिणीचे मुख पश्चिम दिशा च्या बाजूला पाहिजे.