श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ | श्री स्वामी समर्थ विचार | श्री स्वामी समर्थ पावरफुल मंत्र
आपण जर नियमित पणे श्री स्वामी समर्थ ह्यांच्या मंत्राचा जाप केला तर आपल्याला त्याचे बऱ्याच प्रकारचे लाभ मिळू शकतात. मंत्र जाप केल्याने आपल्या शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे आपल्याला स्वास्थ्य मिळून मानसिक विकरा पासून मुक्ती मिळते, मन प्रसन्न राहते, शांती मिळते व त्यामुळे आपली सर्व कामे पार पाडतात.
आज आम्ही श्री स्वामी समर्थ ह्यांची महत्वपूर्ण माहिती व त्यांचा मंत्र सांगणार आहोत.
मंत्र: रोज १०८ वेळा म्हणावा:
“श्री स्वामी समर्थ”
श्री. स्वामी कृपातिर्थ तारक मंत्र:
निःशंक हो, निर्भय हो, मना रे.
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे
अतर्क्स अवधूत हे स्मरण गामी
अशक्यही शक्य करतील स्वामी ॥ १ ॥
जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय
आज्ञेविणा काळ ना नेई त्याला
परलोकीही ना भिती तयाला ॥२॥
उगाची भितोसी भय हे पळू दे
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे
जगी जन्ममृत्यु असे खेळ ज्यांचा
नको घाबरु तू असे बाळ त्यांचा ॥३॥
खरा होई जागा श्रध्देसहित,
कसा होशी त्याविण तू स्वामी भक्त
कितीदा दिला बोल त्यांनीच हात
नको डगमगू स्वामी देतील साथ ॥४॥
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ
स्वामीच या पंचप्राणामृतात
हे तीर्थ घेई, आठवी रे, प्रचिती
न सोडी कदा स्वामी जय घेई हाती ॥५॥
श्री स्वामी समर्थ मंत्र जप लाभ:
१) श्री स्वामी समर्थ ह्यांच्या मंत्राचा जाप केल्याने मनुष्याचे स्वास्थ ठीक राहते. मनुष्याला बऱ्याच रोगांपासून मुक्ती मिळते.
२) मंत्र जाप केल्याने मानसिक शांती मिळते त्याच बरोबर मनुष्याचे डोके थंड व शांत राहते.
३) ज्या लोकांना लवकर रंग येतो त्यांनी रोज नियमित श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जाप करावा.
४) श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप केल्यास व्यक्तीच्या जीवनात सफलता मिळते.
५) मंत्र जाप केल्याने घरातील मुलांच्या अभ्यासात सुधारणा होते.
६) मंत्र जाप केल्याने मनुष्याच्या जीवनात परिवर्तन होते व जीवन सुखी बनते.
७) मंत्र जाप केल्याने आपल्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.
८) मंत्र जाप केल्याने सर्व संकटा पासून मुक्ती मिळते.
९) श्री स्वामी समर्थ ह्यांचे मंत्र खूप प्रभावशाली आहेत त्यामुळे आपले जीवन सुखी समृद्धी बनते.
१०) आपल्याला सर्व संकटा पासून मुक्ती पाहिजे असेलतर रोज श्री स्वामी समर्थ ह्यांचा मंत्र जाप करा.