अधिक मास स्पेशल पारंपारिक पुरणाचे धोंडे (दिंड) लेक-जावयाला करा खुश
अधिक महिना हा दर तीन वर्षांनी एकदा येतो. तसेच हा महिना खूप पवित्र मानला जातो. ह्या महिन्यात भगवान विष्णु ह्यांची सेवा केल्यास त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होते.
The text Traditional Adhik Maas Purnache Dhonde Fried in Marathi be seen on our You tube Chanel Traditional Adhik Maas Purnache Dhonde Fried
अधिक महिन्याला श्रावण अधिक किंवा धोंडयाचा महिना असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रांमद्धे फार वर्षा पासून परंपरा आहे की अधिक महिन्यामध्ये लेकी ला व जावयाला घरी बोलवतात. लेकीला लक्ष्मीचे रूप मानतात तर जावयाला भगवान विष्णु ह्यांचे रूप मानले जाते. तसेच जावई मुलीच्या माता-पिताना भगवान नारायण ह्यांचे रूप म्हणून मानतो.
अधिक महिन्यात जावयाला घरी जेवायला बोलवून सुग्रास अन्न बनवून जेवायला वाढतात. त्यामध्ये पुरणाचे धोंडे किंवा पुरणाचे दिंड बनवले जातात. त्याच बरोबर चांदीचा दिवा व अनारसे सुद्धा भेट म्हणून दिले जातात.
पुरणाचे धोंडे आपण दोन प्रकारे बनवू शकतो. पहिला प्रकार आपण ह्या अगोदर पहिला आहे त्याची लिंक पुढे देत आहे.
आता आपण पुरणाचे दिंड तळून कसे बनवायचे ते पाहू: पुराण कसे बनवायचे येथे लिंकवर क्लिक करा
साहित्य:
पूरण कसे बनवायचे त्याची लिंक मध्ये दिलेली आहे. : पुराण कसे बनवायचे
आवरण बनवण्यासाठी
2 वाट्या गव्हाचे पीठ
1 टे स्पून तूप (गरम)
मीठ चवीने
दूध लागेलतसे पीठ मळण्यासाठी
1 टे स्पून तेल
तेल पुरणाचे दिंड किंवा धोंडे तळण्यासाठी
कृती: पूरण कसे बनवायचे ते आपण पहिले असेलच.
आवरण बनवण्यासाठी: एका बाउल मध्ये गव्हाचे पीठ, मीठ व गरम तूप घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये हळू हळू दूध घालून मिक्स करून पीठ मळून घ्या. आता मळलेले पीठ 15-20 मिनिट झाकून ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे छोटे छोटे लिंबा एव्ह्डे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन छोट्या पुरी सारखा लाटून त्यामध्ये 2 टे स्पून पुराण भरून गोळा बंद करून मोदका सारखा आकार द्या मग वरचा मोदका सारखा दिलेला आकार मुडपून गोल थोडा चपटा असा आकार द्या. अश्या प्रकारे सर्व धोंडे किंवा दीड बनवून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झालेकी त्यामध्ये धोंडे छान गुलाबी रंगावर तळून घ्या.
गरम गरम धोंडे तूप घालून सर्व्ह करा.