स्वादिष्ट मलई सुजी मोदक | मलई रवा मोदक गणपती बाप्पा नेवेद्यसाठी
आता गणेश उत्सव जवळच आला आहे. मग आपण रोज यूट्यूबवर किंवा वेबसाइटवर मोदकाच्या रेसीपी शोधतो. आज आपण अशीच एक छान मोदकची रेसीपी पाहणार आहोत. मलई मोदक स्वादिष्ट लागतात तसेच बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत.
मलई मोदक बनवताना त्याच्या सारणामद्धे ड्रायफ्रूट व गुलकंद घातला आहे त्यामुळे त्याची टेस्ट मस्त लागते. मोदकाच्या आवरणासाठी बारीक रवा, डेसिकेटेड कोकनट, मलई व दूध वापरले आहे.
गणपती बाप्पाना मलई सुजी मोदक खूप आवडतात ह्या गणेश चतुर्थीला बनवा.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 11 मोदक
साहित्य:
मोदकच्या आवरणासाठी:
1 कप बारीक रवा
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
4 टे स्पून तूप
4 टे स्पून मलई (फ्रेश क्रीम)
4 टे स्पून दूध
1 टी स्पून वेलची पावडर
1 कप पिठीसाखर
मोदकच्या सारणासाठी:
5-6 बदाम
5-6 काजू
5-6 पिस्ते
2 टे स्पून गुलकंद
2 टे स्पून डेसिकेटेड कोकनट
कृती: मोदक आवरणासाठी: कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये बारीक रवा व डेसिकेटेड कोकनट मिक्स करून मंद विस्तवावर छान गुलाबी रंगावर भाजून घ्या.
मग त्यामध्ये मलई व दूध मिक्स करून हळू हळू घालून मिक्स करा. रवा छान फुलला की त्यामध्ये वेलची पावडर, पिठीसाखर घालून मिक्स करून घेऊन चांगली वाफ आली की विस्तव बंद करून कढई बाजूला ठेवा.
मोदक सारणासाठी: काजू-बदाम-पिस्ते तुकडे करून घ्या. मिक्सरच्या जार मध्ये काजू-बदाम-पिस्ते, डेसिकेटेड कोकनट व गुलकंद एकदा ब्लेंड करून घ्या. मग एक बाउलमध्ये मिश्रण काढून घ्या.
मोदक बनवण्यासाठी मोदक बनवण्याचा मोल्ड घ्या. आता मोल्ड मध्ये मिश्रण भरून बोटानि दाबून घेऊन मध्यभागी थोडेसे सारण भरून वरतून परत मिश्रण लाऊन घ्या. आता मोल्ड मधील मोदक हळुवार पणे
एका प्लेट मध्ये काढून घ्या. अश्या प्रकारे सर्व मोदक बनवून घ्या.
मोदक बनवून झालेकी गणपती बाप्पाना नेवेद्य दाखवा.