श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल खोपरा पाक सुक्या खोबऱ्याची बर्फी नेवेद्यसाठी
श्रावण महिना चालू झालाकी रोज कोणतान कोणता सण वार असतो. आता श्री कृष्ण जन्माष्टमीला स्पेशल खोपरा पाक बनवतात. भगवान श्री कृष्ण ह्याचा आवडतीचा हा नेवेद्य आहे.
नारळाचा पाक हा शुभ मानला जातो. कारण की भोग म्हणून ही मिठाई अर्पण करतात.
आज आपण अगदी सोप्या पद्धतीने खोपरा पाक कसा बनायचा ते पाहू या. खोपरा पाक बनवताना सुके खोबरे वापरले जाते त्यामुळे मिठाईची टेस्ट खूप निराळी लागते. आपण ह्या मध्ये मावा सुद्धा घालून बनवू शकतो. पण बिना मावा घालता सुद्धा ही मिठाई खूप छान लागते.
श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल खोपरा पाक सुक्या खोबऱ्याची बर्फी नेवेद्यसाठी विडियो लिंक पुढे दिलेली आहे: खोपरा पाक सुक्या खोबऱ्याची बर्फी
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 15 वड्या बनतात.
साहित्य:
1 कप सुके खोबरे (किसलेले)
3/4 कप साखर त्यापेक्षा थोडी कमी
2 चमचे खसखस
1/4 कप काजू-बदाम-पिस्ते (तुकडे करून)
1 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ
1 टी स्पून तूप
कृती: प्रथम सुके खोबरे किसून बाजूला ठेवा. काजू-बदाम-पिस्ते तुकडे करून घ्या. पॅन किंवा कढई गरम करायला ठेवा मग त्यामध्ये मंद विस्तवावर सुके खोबरे 5 मिनिट भाजून घेऊन बाजूला ठेवा. मग खसखस थोडीशी भाजून बाजूला ठेवा, ड्रायफ्रूट सुद्धा थोडे गरम करून बाजूला ठेवा.
मग भाजलेले खोबरे, खसखस, ड्रायफ्रूट, वेलची पावडर, जायफळ मिक्स करून घ्या. एक स्टीलच्या प्लेटला तूप लाऊन ठेवा.
मग त्याच पॅन किंवा कढईमध्ये साखर व 1/2 कप पाणी घालून एक तारी पाक बनवून घ्या. बोटणी पाकाची एक तार आली का ते चेक करा मग त्यामध्ये मिक्स केलेले मिश्रण घालून मिक्स करून घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या.
आता मिश्रण घट्ट आलेकी तूप लावलेल्या प्लेटमध्ये काढून घेऊन एक सारखे करून घेऊन कोमट झालेकी त्याच्या वड्या कापून घ्या. मग थंड झाल्यावर बाळ कृष्णना नेवेद्य दाखवा.