पितृ पक्ष 2023 कधी व श्राद्धची संपूर्ण माहिती
पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 शुक्रवार ह्या दिवशी सुरू तसेच 14 ऑक्टोबर 2023 शनिवार ह्या दिवशी अमावस्या असून ह्या दिवशी संपत आहे. पितृ पक्षाचा काल सुरू झाला की असे म्हणतात आपले पूर्वज आपल्या भूमीवर अवतरतात. म्हणून ह्या काळात आपण श्राद्ध करून त्यांचे आशीर्वाद घेतो.
आपल्या हिंदू धर्मात मृत्युच्या नंतर श्राद्ध करणे जरुरीचे आहे. असे म्हणतात की जर आपण आपल्या पूर्वजांचे विधिपूर्वक श्राद्ध केले नाहीतर त्यांना मुक्ती मिळत नाही व त्याचा आत्मा भूत-प्रेत च्या रूपात भटकत राहतो. म्हणूनच आपण पितृ पक्षमध्ये आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून त्यांना मुक्ती देणे खूप महत्वाचे आहे.
पितृ पक्षचे महत्व, पितृ पक्ष श्राद्ध विधि व कोणत्या दिवशी श्राद्ध करावे:
The Marathi language video of this Pitru Paksha Information 2023 can be seen on our YouTube Channel: Pitru Paksha Information 2023
पितृ पक्षचे महत्व :
ब्रह्म वैवर्त पुराणात सांगितल्या प्रमाणे देवांना प्रसन्न करण्या अगोदर आपल्या पूर्वजांना प्रसन्न करायला पाहिजे. पितरांची शांति ही दर वर्षी भाद्रपद शुक्ल पूर्णिमा पासून आश्विन कृष्ण अमावस्या पर्यन्त ह्या कालावधीमध्ये पितृ पक्ष श्राद्ध करायचे असते.
भाद्रपद शुक्ल पूर्णिमा पासून आश्विन कृष्ण अमावस्या पर्यन्त यमराज पितरांना मोकळे करतात. कारण की मग आपले पितर आपल्या प्रियजनाचे श्राद्ध ग्रहण करू शकतात. असे म्हणतात की ज्या घरातील पितृ आपल्या परिवाराच्या लोकांकडून खुश होतात त्यांना देवान कडून आशीर्वाद मिळतो. आपल्या देशात वयस्कर लोकाना देवाचे स्थान दिले जाते. म्हणूनच त्याच्या मृत्यू नंतर त्यांचे श्राद्ध कर्म केले जाते.
शात्रा नुसार ज्या घरातील पितृ त्याच्या घरातील लोकांपासून प्रसन्न नसतील त्यांना पितृ दोषचा शाप मिळतो. असे म्हणतात की ज्या घराला पितृ दोषचा शाप मिळतो त्या घरातील सदस्य कधी सुखी होत नाहीत व ते त्यांच्या आयूषात कधी सफल सुद्धा होत नाहीत. म्हणूननच पितृ पक्ष मध्ये पितरांचे श्राद्ध करून त्यांची क्षमा याचना करावी.
पितृ पक्ष श्राद्ध विधि:
पितृ पक्षमध्ये घरातील व्यक्तिनि सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावे.
श्राद्ध मध्ये तीळ, भात व जवस हे नक्की वापरावे.
मग आपल्या पितरांचे आवडतीचे जेवण बनवावे. जेवणा बरोबर तीळ सुद्धा अर्पित करावे.
तीळ अर्पित केल्यावर जेवणाची पिंड बनवून ते अर्पित करावे.
मग ब्राह्मण ना भोजन जेवून वस्त्र व दक्षिणा द्या.
श्राद्धच्या नंतर कावळ्याला भोजन अवश्य द्या कारणकी पितृ पक्ष मध्ये कावळ्याला पितरांचे रूप मानले जाते.
पितृ पक्ष तिथि प्रारंभ:
पितृ पक्ष प्रारंभ तिथि- 29 सप्टेंबर 2023 शुक्रवार
पितृ पक्ष समाप्ति तिथि -14 ऑक्टोबर 2023 शनिवार
कोणत्या दिवशी श्राद्ध करावे:
खर म्हणजे प्रतेक महिन्याच्या अमावस्या ह्या दिवशी पितरांच्या शांती करिता पिंड दान व श्राद्ध कर्म करू शकता. पण पितृ पक्ष मध्ये श्राद्ध करण्याचे महत्व अधिक असते.
पितृ पक्ष कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ते शास्त्रा नुसार तिथी नुसार करावे म्हणजे ज्या दिवशी मृत व्यक्तीची तिथी असेल त्या तिथीला करावे.
समजा आपल्या तिथी लक्षात नसेल तर आपण सर्व पितृ अमावस्या ह्या दिवशी म्हणजेच आश्विन अमावस्या ह्या दिवशी करू शकतो.
जर आपल्या प्रियजनांचा मृत्यु कोणत्या दुर्घटना अथवा सुसाइड ह्या कारणांनी झाला असेल तर श्राद्ध चतुर्दशी ह्या तिथिला करतात.
वडिलांचे अष्टमी ह्या तिथिला तर आईचे नवमी ह्या तिथिला श्राद्ध करतात.