स्वादिष्ट गोविंद लाडू | पौष्टिक पोह्याचे लाडू
जन्माष्टमी च्या दिवशी गोविंद लाडूचा प्रसाद दाखवतात कारणकी बाळ कृष्णना पोह्याचे लाडू खूप आवडतात. तसेच पोह्याचे लाडू पौष्टिक सुद्धा आहेत. आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. पाहे, गूळ व सुके खोबरे ह्याची टेस्ट अगदी निराळी लागते.
गोविंद लाडू बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत मुलांना डब्यात द्यायला सुद्धा छान आहेत. पोह्याचे लाडू बनवताना पोहे अगदी खूपवेळ भाजायची गरज नाही. थोडे गरम केले तरी चालतात. तसेच ह्यामध्ये साखरेचा किंवा गुळाचा पाक बनवण्याची गरज नाही. फक्त गूळ टाकून मस्त लागतात. गूळ आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे.
गोविंद लाडू किंवा पोह्याचे लाडू कसे बनवायचे ते पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पहा: गोविंद लाडू
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 12-14 लाडू बनतात
साहित्य:
2 कप जाडे पोहे
3/4 कप गूळ
3-4 टे स्पून तूप
1/4 कप सुके खोबरे (किसून)
7-8 काजू
7-8 बदाम
2 टे स्पून किसमिस
1 टी स्पून वेलची पावडर
कृती: सुके खोबरे किसून घ्या. गूळ चिरून घ्या.
एका जाड बुडाच्या कढईमध्ये पोहे 5 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या. मग पोहे एका प्लेटमध्ये काढून घ्या. त्याच कढई मध्ये सुके किसलेले खोबरे थोडे भाजून घ्या मग बाजूला काढून ठेवा. काजू बदाम पण थोडे गरम करून घ्या. काजू-बदामचे तुकडे करून घ्या.
आता मिक्सरच्या भांड्यात पोहे घेऊन थोडे जाडसर वाटून घ्या. मग त्यामध्ये गूळ घालून परत एकदा ब्लेंड करून घ्या. आता मिश्रण प्लेटमध्ये काढून घ्या. त्यामध्ये सुके खोबरे, काजू-बदाम-किसमिस, वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये तूप घालून मिक्स करून घ्या.
मग मिक्स केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे लाडू वळून घ्या. लाडू वळून झालेकी बाळ कृष्णना नेवेद्य दाखवा.