10 Minitat Upvasacha Healthy Rajgira Pithacha Halwa Recipe In Marathi
10 मिनिटात उपवासचा पौष्टिक राजगिरा पिठाचा शीरा
आता नवरात्री चालू आहे काही जणांचे 9 दिवसाचे उपवास असतात. मग रोज काहीना काही निराळे बनवायचे एक तिखट पदार्थ व एक गोड पदार्थ.
उपवासासाठी राजगिरा पिठाचा शीरा बनवा खूप छान टेस्टि लागतो तसेच बनवायला सोपा झटपट होणारा आहे. राजगिरा हा आपल्या शरीराची उपयोगी सुद्धा आहे. कारण की तो खूप पौष्टिक आहे.
राजगिरामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे. राजगिरामध्ये दुधाच्या तिप्पट कॅल्शियम आहे. आपली चाळीशी नंतर हळू हळू हाडे झिजायला लागतात तर आपल्या आहारात राजगिरा जरूर समाविष्ट करा.
राजगिराच्या सेवनाने रोग प्रतिकार शक्ति वाढते. त्यामध्ये विटामीन “C” आहे.
राजगिरा पिठाचा शीरा किंवा हलवा कसा बनवायचा ह्याची विडियोची लिंक पुढे दिली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: राजगिरा पिठाचा हलवा (शीरा)
राजगिरा पिठाचा हलवा आपण उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणसाठी
साहित्य:
1/2 वाटी राजगिरा पीठ
3 टे स्पून तूप
1/4 वाटी साखर
2 वाट्या पाणी (गरम)
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट तुकडे करून
कृती: एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये राजगिरा पीठ घालून मंद विस्तवावर 5-7 मिनिट भाजून घ्या. मग त्यामध्ये 2 वाट्या गरम पाणी घालून मिश्रण आटे पर्यन्त मंद विस्तवावर ठेवा.
आता मिश्रण थोडे घट्ट झाल्यासारखे वाटले की त्यामध्ये साखर घालून मिक्स करा. मिश्रण घट्ट झालेकी त्यामध्ये ड्रायफ्रूट व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.
गरम गरम राजगिरा पिठाचा हलवा सर्व्ह करा. सर्व्ह करताना वरतून ड्रायफ्रूटने सजवून सर्व्ह करा.