15 मिनिटांत इन्स्टंट मिल्क ब्रेड डेझर्ट बिना गॅस
15 Miniutes Instant Bread Rasmalai Recipe In Marathi
15 मिनिटांत दूध व ब्रेड वापरुन मस्त स्वादिष्ट गॅस न वापरता आपण झटपट अश्या प्रकारचे डेझर्ट बनवू शकतो तसेच बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर आपण 15 मिनिटात थंडगार डेझर्ट बनवू शकतो.
डेझर्ट बनवताना ब्रेड सॅंडविच बनवले आहे व इन्स्टंट बासुंदी बनवली आहे. बासुंदी बनवताना तिला थोडे घट्ट कसे बनवायचे त्याची सोपी ट्रिक आहे.
इन्स्टंट मिल्क ब्रेड डेझर्ट ह्या रेसीपीचा शॉर्ट विडियो पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता: ब्रेड रसमलाई
इन्स्टंट मिल्क ब्रेड डेझर्ट दिसायला सुद्धा आकर्षक दिसते व टेस्टि सुद्धा लागते. आपण जेवणानंतर सुद्धा सर्व्ह करू शकतो किंवा स्वीट डिश म्हणून सुद्धा सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 15 मिनिट
वाढणी: 4 जणसाठी
साहित्य:
6 ब्रेड स्लाइस
2 कप दूध (फूल क्रीम)
2 टे स्पून पिठीसाखर
2 टे स्पून मिल्क पावडर
1/4 कप केशर घातलेले दूध
1 टी स्पून वेलची पावडर
ड्रायफ्रूट (तुकडे करून)
सारणासाठी:
2 टे स्पून मिल्क पावडर
1 टे स्पून पिठीसाखर
1 टे स्पून क्रीम
1 टे स्पून दूध
सजावटीसाठी: ड्रायफ्रूट, गुलाब पाकळ्या
कृती: फूल क्रीम दुध थंड घ्या. मग त्यामध्ये पिठीसाखर, मिल्क पावडर, वेलची पावडर, ड्रायफ्रूटक तुकडे करून टाका. मग दूध फ्रीजमध्ये परत थंड करायला ठेवा.
सारण बनवण्यासाठी एका बाउलमध्ये पिठीसाखर, मिल्क पावडर, क्रीम, वेलची पावडर व थोडेस दूध घालून मिक्स करून घ्या.
एका प्लेटमध्ये ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्याच्या कडा कापून टाका.
ब्रेडच्या स्लाइस घेऊन त्याना एका बाजूनी थोडेसे सारण लाऊन घ्या. मग एक स्लाइस घेऊन त्यावर दुसरी स्लाइस ठेवा त्याचे त्रिकोणी चार भाग करा. सर्व ब्रेडला सारण लाऊन त्याच्या 4-4 तुकडे कापून घ्या.
एक खोलगट अशी प्लेट घेऊन त्यामध्ये सर्व ब्रेडचे तुकडे मांडून घ्या. त्यावर थोडे थोडे नॉर्मल दूध घाला मग त्यावर आपण तयार केलेले थंड दूध घाला वरतून ड्रायफ्रूटनी सजवून थंड करून सर्व्ह करा.