Chandra Grahan On Sharad Purnima 2023 In Marathi
कोजागिरी पूर्णिमा चंद्र ग्रहण ही चूक करू नका होईल अनर्थ
कोजागिरी पूर्णिमा ह्या दिवशी खीर किंवा मसाला दुधाचे महत्व असते. आपण दरवर्षी रात्रीच्या वेळी चांदीच्या भाड्यात खीर चंद्र प्रकाशात ठेवतो त्यामुळे चंद्राची किरण खीर वरती पडून त्याचा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदे होतो. शरद पूर्णिमा ह्या दिवशी पृथिवर सर्व ठिकाणी चंद्राची किरणे पसरतात व अमृत वर्षाव होतो असे म्हणतात. तसेच उपवास सोडण्यासाठी पण आपण खीर बनवतो. खीर लक्ष्मी माताला प्रिय आहे.
कोजागिरी पूर्णिमा हा दिवशी लक्ष्मी माताला समर्पित आहे. ह्या दिवशी लक्ष्मी माताचे आपल्या घरात स्वागत व्हावे म्हणून घरा समोर सडा रांगोळी घालतात लक्ष्मीची पावल काढतात व रात्र जागवून लक्ष्मी माताची गाणी, आरती व भजन म्हणतात. असे म्हणतात की ह्या दिवशी रात्री जो भक्त रात्र जगवून काढतो तेथे लक्ष्मी माता जावून भक्ताची मनोकामना पूर्ण करते व त्याला सुख समृद्धीचा आशीर्वाद देते.
28 ऑक्टोबर 2023 शनिवार ह्या दिवशी चालू वर्षातील शेवटचे चंद्र ग्रहण आहे. त्यामुळे ह्या वर्षी चंद्राची किरणे पृथ्वीवर पडणार नाहीत किंवा अमृतवर्षाव सुद्धा होणार नाही. तसेच ह्यावर्षी खीर किंवा मसाला दूध चंद्र प्रकाशात ठेऊ नये. चंद्र प्रकाशात ठेवले तर ते अशुद्ध होऊ शकते.
28 ऑक्टोबर शनिवार ह्या दिवशी ग्रहण आहे.
संध्याकाळी 4 वाजल्या पासून सूतक काल चालू होत आहे.
शरद पूर्णिमा ह्या दिवशी रात्री 1 वाजून 6 मिनिट पासून ग्रहण चालू होत असून मध्य रात्री 2 वाजून 24 मिनिट पर्यन्त आहे. त्याचा सूतक काळ 4 वाजता सुरू होत आहे. त्यामुळे ग्रहण काळा मध्ये खीर बनवणे योग्य नाही. ग्रहण काळ सुरू होण्याच्या अगोदर खीर किंवा मसाला दूध बनवून तुळशी पत्र घालून झाकून बाजूला ठेवा. त्यामुळे सूतक काळात दूध शुद्ध राहील. ग्रहण संपल्यावर मग भोग दाखवू शकतो.
शरद पूर्णिमा तिथि प्रारंभ : 28 ऑक्टोबर, शनिवार, सकाळी: 04:17 पासून
शरद पूर्णिमा तिथि समाप्त: 29 ऑक्टोबर, रविवार, 01:53 रात्री पर्यन्त
चंद्र ग्रहण 2023 वेळ:
ग्रहण स्पर्श रात्री – 1:05 वाजता
ग्रहण मध्य रात्रि 1:44 वाजता
ग्रहण मोक्ष रात्रि 2:24 वाजता
ग्रहण सूतक दुपारी – 4:05 वाजता
शरद पूर्णिमा पासून ते कार्तिक पूर्णिमा पर्यन्त दीपदान करण्याची प्रथा आहे. त्यामुळे दुख दारिद्रचा नाश होतो. शरद पूर्णिमा ह्या दिवशी श्री कृष्ण भगवान ह्यांनी गोपिका बरोबर यमुना नदीच्या काठी महारास क्रीडा केली होती. म्हणून ह्या दिवशी महारास चे सुद्धा आयोजन करतात.