स्वादिष्ट सोपी 7 कप बर्फी | सात कप बर्फी
7 कप बर्फी ही रेसीपी भारतातील दक्षिण ह्या भागातील लोकप्रिय मिठाई आहे. 7 कप बर्फी ही बनवायला अगदी सोपी झटपट होणारी आहे.
7 कप म्हणजे प्रतेक साहित्य हे 1 कप असे मोजून घेतले आहे त्यामुळे त्याला 7 कप असे नाव पडले. पण आपण आपल्या आवडीनुसार साहित्य कमी किंवा जास्त घेवू शकता.
7 कप मिठाई बनवताना त्यामध्ये एकच कष्ट आहे की मिश्रण सारखे हलवावे लागते. त्याची चव सुद्धा छान लागते. मिठाई बनवताना ओला नारळ वापरुन सुद्धा बनवता येते पण मग ती 2 दिवसांत संपवावी लागते आपण ओला नारळ एवजी डेसिकेटेड कोकनट सुद्धा वापरू शकता. किंवा सुके खोबरे किसून वापरू शकता. 7 कप मिठाई बनवण्यासाठी खवा किंवा मावा किंवा क्रीमची आवशक्ता नाही.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 16 वड्या
साहित्य:
1 कप बेसन
1 कप तूप
1 कप खोबरे
1 कप दूध (फूल क्रीम)
1 कप मिल्क पावडर किंवा काजू पावडर
2 कप साखर
1/2 टी स्पून वेलची पावडर
1/4 टी स्पून जायफळ पावडर
ड्रायफ्रूट सजावटी करिता
कृती: एक कढई मध्ये तूप गरम करून त्यामध्ये बेसन 2 मिनिट भाजून घ्या मग त्यामध्ये खोबरे घालून मिक्स करून 2 मिनिट मंद विस्तवावर भाजून घ्या.
मग त्यामध्ये दूध व साखर घालून मिक्स करून मिश्रण घट्ट होई पर्यन्त आटवून घ्या.
मिश्रण घट्ट झालेकी विस्तव बंद करून मिश्रण थोडे थंड होऊ द्या. मग त्यामध्ये वेलची पावडर, जायफळ पावडर व मिल्क पावडर घालून मिक्स करून घ्या.
एक स्टीलच्या ट्रे ला तूप लावून त्यामध्ये मिश्रण काढून एक सारखे थापुन त्यावर ड्रायफ्रूट घालून मग एक सारख्या वड्या कापून घ्या. मग सर्व्ह करा.