In 10 Minites Navratri Special Upvasache Patis Recipe In Marathi
10 मिनिटात नवरात्री स्पेशल चटपटीत उपवासाचे प्याटीस (पॅटीस )साबूदाणा नभिजवता
नवरात्री हा सण आता सुरू होत आहे. नवरात्री मध्ये बरेच जणाचे 9 दिवसाचे उपवास असतात. मग रोज सकाळी संध्याकाळ काय करायचे हा प्रश्न पडतो.
आज आपण झटपट 10 मिनिटांत उपवासाचे पॅटीस कसे बनवायचे ते पाहू या. बरेच वेळा आपण साबूदाणा भिजवून काही उपवासाचे पदार्थ बनवतो. पण एखाद वेळी आपण साबूदाणा भिजवायचा विसरून जातो. मग आपण ही सोपी झटपट उपवासची डिश बनवू शकतो.
उपवासाचे पॅटीस बनवताना साबूदाणा भिजवायची गरज नाही. तसेच बटाटे सुद्धा उकडायची गरज नाही. उपवासाचे पॅटीस बनवायला अगदी सोपे आहेत तसेच स्वादिष्ट व चमचमीत लागतात.
10 मिनिटात नवरात्री स्पेशल चटपटीत उपवासाचे प्याटीस (पॅटीस )साबूदाणा नभिजवता ह्याचा शॉर्ट विडियो पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता: उपवासाचे पॅटीस
पॅटीस आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. आपण दह्या बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 8 पॅटीस बनतात
साहित्य:
1 छोटी वाटी साबूदाणा
2 मध्यम आकाराचे बटाटे
2 हिरव्या मिरच्या
1/2” आले तुकडा (उपवासला चालत असेल तर)
1 टी स्पून चिली फ्लेस्क
2 टे स्पून कोथिंबीर
2 टे स्पून शेंगदाणा कूट
1 टी स्पून जिरे
मीठ चवीने
तेल पॅटीस तळण्यासाठी
कृती: एका पॅन मध्ये साबूदाणा मंद विस्तवावर 2 मिनिट गरम करून घ्या. मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. शेगदाणे भाजून सोलून कुटून घ्या.
दोन बटाटे सोलून त्याचे तुकडे करून धुवून घ्या. मिक्सरच्या जार मध्ये बटाटे तुकडे, हिरवी मिरची, आले तुकडा व 1/4 वाटी पाणी घेऊन ग्राइंड करून घ्या. मग एका बाउलमध्ये काढून घ्या.
आता त्यामध्ये साबूदाणा पावडर, चिरलेली कोथिंबीर, शेंगदाणा कूट, जिरे, मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्याचे छोटे छोटे चपटे गोळे बनवून घ्या. त्याला बदामाचा आकार द्या.
कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झालेकी त्यामध्ये पॅटीस छान कुरकुरीत होई पर्यन्त तळून घ्या.
गरम गरम उपवासाचे पॅटीस चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर सर्व्ह करा.