Navratri 2023 Devi Mata 9 Roop 9 Bhog W Bhog Mantra In Marathi
नवरात्री 2023: नवरात्रीमध्ये 9 दिवस माता दुर्गाला कोणते भोग दाखवल्या कृपा मिळेल
शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबर 2023 रविवार ह्या दिवसापासून सुरू होत असून 23 ऑक्टोबर सोमवार ह्या दिवशी संपन्न होत आहे. व 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार ह्या दिवशी दसरा आहे. ह्या वर्षी नवरात्री पूर्ण 9 दिवसांची आहे.
नवरात्री मध्ये माताचा भक्त आपल्या परीने माताला नेवेद्य दाखवून पूजा अर्चा करीत असतो. पण असे म्हणतात की नवरात्री मध्ये 9 दिवस माताच्या नऊ रूपांची पूजा अर्चा करून त्याना विशिष्ट भोग दाखवला तर माताची दुप्पट कृपा प्राप्त होते.
माताचे रूप माताची विविध 9 रूप माताचे विविध रुपाचे 9 विविध भोग
प्रथम रूप – माता शैलपुत्री – शुद्ध तुपातील मिठाई
दुसरे रूप – माता ब्रह्मचारिणी – साखर व फळ
तिसरे रूप – माता चंद्रघंटा – दूध, मिठाई, व खीर
चौथे रूप – माता कुष्मांडा – मालपुवा
पाचवे रूप – माता स्कंदमाता – केळे, पेढे, बडीशेप
सहावे रूप – माता कात्यायनी – मध्, लाडू, दही
सातवे रूप – माता कालरात्री – गूळ, पेढा, दही
आठवे रूप – माता महागौरी – नारळ, पेढा
नउवे रूप – माता सिद्धीदात्री – तील, पांढरे लाडू
नवरात्रि मध्ये माताच्या भक्तांनी पुढील गोष्टी लक्षात ठेवाव्या.
नवरात्री मध्ये भक्तांनी नऊ दिवश विशेष स्वच्छता ठेवावी. घरात कांदा-लसूण वापरू नये. मास-मच्छी बनवू नये. तसेच शक्य असेलतर 9 दिवस उपवास ठेवावा. व सात्विक भोजन आपल्या हातांनी बनवून ते सेवन करावे.
माताला भोग अर्पित करताना पुढे दिलेला मंत्र म्हणावा:
सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोs स्तुते ||