नवरात्री 2023 देवीच्या रुपाचे नऊ दिवसाचे नऊ शुभ रंग व त्याचे महत्व
Navratri 9 Days Colours and Significance In Marathi
नवरात्री सण दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रविवार ते 24 ऑक्टोबर 2023 मंगळवार पर्यंत आहे.
नवरात्री हा हिंदू धर्मातील खूप खास सण आहे. भारतात दरवर्षी नवरात्री हा सण दोन वेळा साजरा करतात. एक म्हणजे चैत्र महिना (मार्च-एप्रिल) व शरद म्हणजेच (ऑक्टोबर-नव्हेबर) होय.
नवरात्री ह्या सणाला खूप महत्व आहे. असे म्हणतात की नवरात्री मध्ये माता दुर्गाची नऊ विविध रूप आहेत त्या रूपांची विविध रंगांनी पूजा केल्याने आपल्याला माता दुर्गा आशीर्वाद देते. तसेच ह्या रंगामुळे आपल्या घरात सुख समृद्धी येते. तसेच काही लोक ह्या रंगांनी आपल्या पूजा घरात सजावट करतात.
आपल्या देशात विविध प्रांतात वेळवेगळ्या पद्धतीने नवरात्री हा सण साजरा करतात. खर म्हणजे नवरात्री मध्ये काली माता व दुर्गा माता चा विजय उत्सव म्हणून साजरा करतात. नवरात्री मध्ये महिला नऊ दिवस उपवास करतात व त्या त्या रंगाचे कपडे परिधान करून आपल्या मैत्रिणीना भेटायला जातात. त्याच बरोबर रोज छान छान पकवान सुद्धा बनवतात.
नवरात्री 2023 : 9 रंग कोणते ते पाहू या:
नवरात्री मध्ये 9 दिवस पुढील दिलेले रंग परिधान करून सजून पुजा अर्चा करणे खास मानले जाते.
त्याच बरोबर आपल्या घरातील देवघराची सुद्धा त्या रंगाच्या फुलांनी सजावट करा.
1) पहिला दिवस 15 ऑक्टोबर: नारंगी रंग
नारंगी रंगाचे कपडे घालून पूजा केल्यास स्फूर्ति व उल्हास मिळतो तसेच सकारात्मक ऊर्जा मिळून चित्त स्थिर ठेवते.
2) दूसरा दिवस 16 ऑक्टोबर: पांढरा रंग
पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा केल्यास शुद्धता व सरळ मार्गाचे पर्याय मिळतात. पांढरा रंग आत्मशान्ती व सुरक्षाचा अनुभव देतो.
3) तिसरा रंग 17 ऑक्टोबर: लाल रंग
लाल रंग देवी माताशी जोडला गेला आहे. लाल रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास उत्साह व प्रेमाचे प्रतीक मिळते व लोकप्रियतेची शक्ति मिळते साहस व शक्ति प्राप्त होते.
4) चौथा दिवस 18 ऑक्टोबर: रॉयल ब्ल्यु रंग
डार्क निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास अतुलनीय आनंद अनुभवायला मिळतो. समृद्धी व शांतीचे प्रतीक मानले जाते.
5) पाचवा दिवस 19 ऑक्टोबर: पिवळा रंग
पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास मनुष्याचे चित्त नीट राहते व अशांती दूर होऊन मन प्रसन्न व प्रफुलीत राहते.
6) सहावा दिवस 20 ऑक्टोबर: हिरवा रंग
हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास शांती व स्थिरताची भावना उत्पन्न होते. जीवनात काहीतरी नवीन गोष्ट करण्याचे प्रतीक आहे.
7) सातवा दिवस 21 ऑक्टोबर: करडा रंग
करड्या रंगाचे कपडे घालून पूजा केल्यास व्यावहारिक जीवनात सरळ बनून निशचित विचारधारा ठेवणारे हे ह्या रंगाचे प्रतीक आहे.
8) आठवा रंग 22 ऑक्टोबर: जांभळा रंग
जांभळ्या रंगाची अॅसटर ची फूल किंवा कापडाचा वापरू करून सजवू शकता. जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून पूजा केल्यास राजेशाही थाट बाटचे प्रतीक आहे.
9) नववा दिवस 23 ऑक्टोबर: मोरपंखी हिरवा रंग
मोरपंखी हिरवा रंगाचे म्हणजेच निळा व हिरवा रंग मिश्रण केल्यावर जो रंग होतो त्या वस्त्राचे परिधान करून पूजा केल्यास समृद्धी व नवीनताचा लाभ होतो.
10) दहावा दिवस 24 ऑक्टोबर मंगळवार दसरा आहे.
देवीचे विविध रंग वापरल्यास पूजा करून झाल्यावर समृद्धी व संपन्नता प्राप्त होते.