नवरात्री स्पेशल टेस्टि चमचमीत उपवासाचा दही वडा
Tasty Spicy Navratri Special Upwasacha Dahi Vada in Marathi
आपण उपवास असला की साबुदाणा वापरुन साबूदाणा खिचडी, साबूदाणा वडा किंवा थालीपीठ बनवतो किंवा बटाटा वापरुन त्याची भाजी बनवतो. तसेच रताळी वापरुन सुद्धा आपण त्याचे पदार्थ बनवतो.
पण आपण उपवासचा दही वडा बनवला आहे का? उपवासचा दही वडा बनवून पहा नक्की घरात सगळ्याना आवडेल. तसेच बनवायल अगदी सोपा व झटपट होणारा आहे. उपवासाच्या दिवशी छान थंडगार दही वडा सेवन केला तर छान वाटते.
उपवासचा दही वडा विडियो लिंक पुढे दिली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: उपवासचा दही वडा
उपवासचा दही वडा बनवताना प्रथम बटाटे उकडून सोलून किसून घेऊन त्यामध्ये शिंगाडा किंवा राजगिराचे पीठ वापरायचे त्यामुळे तळताना त्याला छान बाईडिंग होईल व ते तेलात फुटणार नाहीत. त्यामध्ये हिरवी मिरची व जिरे घातले आहेत त्यामुळे छान चमचमीत लागतात.
दही हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. त्याच्या सेवनाने शिरीर थंड राहते.
बनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट
वाढणी: 6 वडे बनतात
साहित्य:
2 मध्यम आकाराचे बटाटे
2 छोट्या हिरव्या मिरच्या (चिरून)
1 टे स्पून कोथिंबीर
2 टे स्पून राजगिरा आटा
1/2 टी स्पून जिरे पावडर
मीठ चवीने
तेल तळण्यासाठी
1 1/2 कप दही
3 टे स्पून साखर
मीठ चवीने
सजावटीसाठी:
कोथिंबीर, लाल मिरची पावडर
कृती: नवरात्री स्पेशल दही वडा बनवण्यासाठी प्रथम दह्यामध्ये साखर व मीठ चवीने घालून मिक्स करून थंड करायला ठेवा.
बटाटे उकडून सोलून किसून घ्या. मग त्यामध्ये चिरलेली हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर चिरून, मीठ चवीने व राजगिरा आटा घालून मिक्स करून 5 मिनिट झाकून बाजूला ठेवा.
मग मळलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये बनवलेले गोळे तळून घ्या.
एका बाउलमध्ये थोडे ताक घेऊन त्यामध्ये तळलेले वडे फक्त 2 मिनिट ठेवा मग लगेच काढून एक बाउलमध्ये ठेवा. मग त्यावर गोड दही घालून वरतून लाल मिरची पावडर व कोथिंबीरने सजवून थंडगार दही वडा सर्व्ह करा.