10 नोव्हेंबर धनतेरस 2023 तिथी मुहूर्त व पूजाविधी संपूर्ण माहिती
10/11 Dhanteras 2023 Tithi, Puja Muhurat Full Information in Marathi
धनत्रयोदशी ह्या वर्षी 10 नोव्हेंबर शुक्रवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी बरोबर कुबेर भगवान ह्यांची पूजा अर्चा करायची आहे. ह्या दिवशी दान धर्म केलेतर आपल्याला 13 गुणा धन प्राप्ती होते.
आपण पाहू या पुजा मुहूर्त व खरेदी कधी करायची आहे:
धनत्रयोदशी 10 नोव्हेंबर शुक्रवार ह्या दिवशी साजरी करायची आहे तेव्हा पासून दिवाळी हा सण सुरू होत आहे. कार्तिक मास कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या दिवशी साजरी करायची आहे. ह्या दिवशी माता लक्ष्मी व कुबेर भगवान ह्यांची पूजा करतात व सोने-चांदी किंवा भांडी खरेदी करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी खरेदी केलेल्या वस्तुमध्ये 13 पट वृद्धी होते. धनत्रयोदशी ह्या दिवशी विधी पूर्वक पूजा अर्चा केल्यास वर्षभर कशाची सुद्धा कमी होत नाही
धनत्रयोदशीचे महत्व:
पौराणिक मान्यता अनुसार असे म्हणतात की कार्तिक मास कृष्ण पक्ष त्रयोदशी ह्या तिथीला समुद्र मंथनच्या वेळी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश हातात घेऊन प्रकट झाले होते. भगवान धन्वंतरी ह्यांना विष्णुचा अवतार मानले जाते. ह्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे महत्वाचे मानले जाते. तसेच दान धर्म केल्याने आपल्या संपत्ति मध्ये 13 पट वाढ होते. ह्या दिवसा पासून दिवाळीची सुरुवात होते ह्या दिवशी आपण आपल्या घरात धने खरेदी करून आणावे त्यामुळे घरात बरकत येते. व माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते.
महालक्ष्मीची पूजा का करतात:
असे मानले जाते की धनत्रयोदशी ह्या दिवशी भगवान धन्वंतरि व माता लक्ष्मी ह्यांची पूजा केली जाते त्यामुळे आपल्या जीवनात धनाची कमतरता नाही राहणार ह्या दिवशी भगवान कुबेर ह्यांची सुद्धा पूजा केली जाते.
धनत्रयोदशी शुभ मुहूर्त:
पंचांग नुसार कार्तिक कृष्ण पक्ष त्रयोदशी तिथी प्रारंभ 10 नोव्हेंबर शुक्रवार दुपारी 12 वाजून 35 मिनिट पासून सुरुवात होऊन 11 नोव्हेंबर शनिवार दुपारी 1 वाजून 57 मिनिट पर्यन्त आहे. ह्या दिवशी प्रदोष सुद्धा आहे त्यामुळे प्रदोष काळात पूजा करणे शुभ मानले जाते.
धनत्रयोदशी लक्ष्मी पूजा शुभ मुहूर्त:
धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी श्री गणेश, लक्ष्मी व कुबरे भगवान ह्यांची पूजा करतात.
पूजा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5 वाजून 47 मिनिट पासून सुरू होणार असून संध्याकाळी 7 वाजून 47 मिनिट पर्यन्त आहे. ह्या वेळेत यमदीप सुद्धा लावणे शुभ आहे.
धनत्रयोदशी ह्या दिवशी सोने खरेदीचा शुभ मुहूर्त:
पंचांग नुसार धनत्रयोदशी च्या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 35 मिनिट पासून सुरू होत असून दुसऱ्या दिवशी म्हणजे 11 नोव्हेंबर शनिवार सकाळी 6 वाजून 40 मिनिट पर्यन्त आहे. ह्या काळात सोने खरेदी केलेतर आपल्या धनामध्ये कितीतरी पट वाढ होते.
धनत्रयोदशी पूजा विधि:
सर्वात पहिले चौरंगावर लाल रंगाचा कपडा घाला. त्याच्या भोवती रांगोळी काढावी.
आता त्यावर गंगाजल शिंपडून चौरंगावर गहू तांदूळ ची रास ठेवावी. त्यावर भगवान धन्वंतरि, माता महालक्ष्मी व भगवान कुबेर चा फोटो किंवा मूर्ती स्थापित करा।
आता तुपाचा दिवा लाऊन अगरबत्ती लावा
त्यानंतर लाल रंगाचे फूल अर्पित करा.
त्यानंतर आपण ह्या दिवशी ज्या धातूची भांडी किंवा दागिने खरेदी केले असतील ते ठेवा.
लक्ष्मी स्तोत्र, लक्ष्मी चालीसा, लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र व कुबेर स्तोत्र चे वाचन करा
धनत्रयोदशीची पूजा करताना माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत रहा व मिठाईचा नेवेद्य दाखवावा.
भगवान कुबेर व लक्ष्मी माता मंत्र:
धनत्रयोदशी ह्या दिवशी ह्या मंत्राचा जप केल्यास अपार ध्यान प्राप्ती होते असे म्हणतात.
ॐ ह्रीं श्रीं क्रीं श्रीं कुबेराय अष्ट-लक्ष्मी मम गृहे धनं पुरय पुरय नमः॥