Govardhan Puja 2023 Muhurth And Pujavidhi In Marathi
14 नोव्हेंबर गोवर्धन पूजा, मुहूर्त व पूजाविधी
हिंदू धर्मामध्ये गोवर्धन पूजाचे खूप महत्व आहे. ह्या दिवशी अन्नाची पूजा केली जाते. त्यामुळे त्याला अन्नकूट पर्व सुद्धा म्हणतात.
चला तर मग पाहू या गोवर्धन पूजा का केली जाते. त्याचा शुभ मुहूर्त व पूजा विधी कय आहे.
गोवर्धन पूजा दरवर्षी कार्तिक मास मधील प्रतिपदा ह्या तिथीला केली जाते. पंचांगनुसार 14 नोव्हेंबर मंगळवार ह्या दिवशी आहे. गोवर्धन पूजा खास करून मथुरा, वृंदावन, बरसाना, गोकुल ह्या भागात केली जाते. पौराणिक मान्यता अनुसार ह्या दिवशी गो-धन म्हणजे गाईची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे. त्याच बरोबर अग्नि देव, वरुण देव व इन्द्र देव ह्यांची पूजा केली जाते. धार्मिक मान्यता अनुसार गोवर्धन पूजा मध्ये विविध प्रकारचे अन्न समर्पित करून त्याची पूजा केली जाते.
गोवर्धन पूजा 2023 शुभ मुहूर्त:
पंचांग अनुसार गोवर्धन पूजा कार्तिक शुक्ल प्रतिपदा ह्या तिथीला केली जाते. ह्या वर्षी कार्तिक प्रतिपदा ची सुरुवात 13 नोव्हेंबर दुपारी 2 वाजून 56 मिनिट नि सुरू होणार असून समाप्ती 14 नोव्हेंबर दुपारी 2 वाजून 56 मिनिट ला होणार आहे.
गोवर्धन पूजा मुहूर्त : 14 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 45 मिनिट ते सकाळी 9 वाजे पर्यन्त आहे.
गोवर्धन पूजा का करायची?
गोवर्धन पूजा ला अन्नकूट पर्व सुद्धा म्हणतात. पौराणिक मान्यता अनुसार ह्या पूजेची सुरुवात द्वापार युगामद्धे भगवान श्री कृष्ण ह्याच्या अवतारानि झाली. ह्या दिवशी गोवंशची पूजा करण्याचे धार्मिक महत्व आहे. त्याच बरोबर पशुधनची सुद्धा पूजा केली जाते. तसेव्ह गाईची शेणापासून अंगणात गोवर्धन ची आकृति बनवतात. मग त्याची पूजा करतात असे म्हणतात की गिरीराज पर्वत ला प्रसन्न करण्यासाठी अन्नकूटचा भोग दाखवतात.
गोवर्धन पूजा साहित्य:
गोवर्धन पूजा करताना गोवर्धन नाथ ला अर्पित करण्यासाठी अक्षता, गाईचे शेण, फूल, मिठाई, हार, पंचामृत मध व रोली ह्याचे महत्व असते. तसेच 56 भोग कहा नेवेद्य सुद्धा दाखवतात.
गोवर्धन पूजा 2023 पूजा विधी:
धार्मिक मान्यता अनुसार गोवर्धन पूजा च्या दिवशी गाईच्या शेणा पासून गोवर्धनची आकृति बनवतात. मग फुलांनी सजवतात. पूजा सकाळी किंवा संध्याकाळी करतात. मग फूल, अक्षता, धूप, दीप व फळ व जल अर्पित करतात. त्याच बरोबर पशुधनची पूजा करतात जी कृषि कार्य साठी उपयोगी आहे. मग दिवा लाऊन त्यामध्ये मध बत्तसे टाकतात. पूजा झाल्यावर प्रसाद देतात.