27 नोव्हेंबर 2023 कार्तिक पूर्णिमा देव दिवाळी तिथी महत्व व उपाय
27 November Kartik Purnima Dev Diwali Tithi, Mahatva W Upay In Marathi
कार्तिक पूर्णिमा ह्या वर्षी 27 नोव्हेंबर सोमवार ह्या दिवशी आहे. हिंदू धर्मा नुसार कार्तिक पूर्णिमाचे विशेष महत्व आहे. ह्या दिवशी देव दिवाळी सुद्धा साजरी करतात. असे म्हणतात की ह्या दिवशी भगवान शिव जिनि त्रिपुरासुर राक्षस ह्याचा वध केला होता. म्हणून ह्या दिवशी त्रिपुरी पूर्णिमा म्हणून सुद्धा साजरी करतात.
कार्तिक पूर्णिमा देव दिवाळी तिथी महत्व व उपाय ह्या विडियोची लिंक पुढे दिली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: कार्तिक पूर्णिमा देव दिवाळी तिथी महत्व व उपाय
कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी स्नान, दान-पुण्य व दीपदान करण्याचे महत्व आहे. ह्या दिवशी भगवान विष्णु व माता लक्ष्मी च्या बरोबर चंद्रदेवची सुद्धा पूजा केल्याने भक्ताल आर्थिक, मानसिक व शरीरीक समस्या पासून मुक्ती मिळते. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा नदीमध्ये किंवा कोणत्या सुद्धा पवित्र कुंडामध्ये स्नान करणे फलदाई आहे.
कार्तिक पूर्णिमा शुभ मुहूर्त, पूजाविधी, व उपाय काय आहे:
कार्तिक पूर्णिमा तिथि 2023
पंचांग नुसार कार्तिक पूर्णिमा तिथी सुरुवात: 26 नोव्हेंबर दुपारी 3 वाजून 52 मिनिट
पूर्णिमा तिथी समाप्ती: 27 नोव्हेंबर दुपारी 2 वाजून 45 मिनिट
उदय तिथी: 27 नोव्हेंबर ह्या दिवशी सत्यनारायण भगवान पूजा, पूर्णिमा व्रत, कार्तिक गंगा स्नान-दान करणे शुभ असते.
कार्तिक पूर्णिमा महत्व:
हिंदू धर्मामध्ये कार्तिक मास खूप पवित्र मानला जातो. ह्या महिन्यात भगवान विष्णु चार महिन्यानंतर निद्रा मधून जागे होतात. तसेच ह्या महिन्यात तुळशी विवाह सुद्धा करतात. कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी गंगा नदीमध्ये स्नान करण्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. त्याच बरोबर ह्या दिवशी चंद्रमा व माता लक्ष्मीची पूजा केल्याने धन वृद्धी होते.
कार्तिक पूर्णिमा उपाय:
आर्थिक स्थिति मजबूत करण्याससाठी कार्तिक पूर्णिमा च्या दिवशी सकाळी स्नान करून पिंपळाच्या झाडाला दूध व साखर मिक्स करून अर्पण करावे. असे केल्याने माता लक्ष्मीची कृपा होऊन धन-दौलत मध्ये वाढ होते.
आपल्याला बरेच प्रयत्न करून सुद्धा करियर व व्यवसायात वाढ होत नसेलतर कार्तिक पूर्णिमा च्या दिवशी माता लक्ष्मील केशर युक्त खीर भोग म्हणून दाखवावी. त्याच बरोबर विधी पूर्वक माता लक्ष्मीची पूजा अर्चा करावी.
माता लक्ष्मीच्या पूजामध्ये पिवळ्या कवड्या ठेवाव्या. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्या कवड्या तिजोरीमध्ये ठेवाव्या. असे केल्याने करियर व व्यवसायात वाढ होईल.
ज्योतिष शास्त्रा नुसार जर आपल्याला जास्त कर्ज झाले आहे व जीवनात सुख समृद्धीचा अभाव आहे तर कार्तिक पूर्णिमा ह्या दिवशी नदीमध्ये दीप दान करावे. असे केल्याने लवकरच कर्जा पासून मुक्ती मिळेल.