9 नोव्हेंबर गुरुवार वसुबारस 2023 संपूर्ण माहिती
9 November Guruwar Vasubaras 2023 Mahiti In Marathi
दिवाळी हा सण रोशनी व अनुष्ठानचा सण आहे. दिवाळी ह्या सणाला सर्व बाजारपेठ, रस्ते गल्या रंगीत रोशनी व फुलांनी सजवलेले दिसते.
वसु बारस हा दिवाळीचा पहिला दिवस महाराष्ट्रमध्ये ह्या दिवसा पासून दिवाळीच्या सणाला सुरुवात होते. वसुबारस ह्या दिवसाचे महत्व म्हणजे गाय व तिचे वासरू ह्यांचा सन्मान करणे.
भारतीय कॅलेंडर नुसार आश्विन मास मधील कृष्ण पक्ष द्वादशी ह्या दिवसाला वसुबारस हा दिवस साजरा करतात.
वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी 2023 ह्याची विडियो ची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी 2023
आपल्या परिवाराचे चांगले स्वास्थ व धन प्राप्तीसाठी विवाहित महिला श्री कृष्ण पूजा व त्याच बरोबर गाईची पूजा करतात.
वसुबारस किंवा गोवत्स द्वादशी 2023 – महत्व
वसुबारस ही सण धनतेरस च्या आधल्या दिवशी साजरा करतात. ह्या वर्षी गोवत्स द्वादशी पण आहे.
वसुबारस ह्या दिवशी गाय व तिचा बछडा ह्याची मनोभावे पूजा करतात. ह्या दिवसाला महत्व आहे कारणकी ह्या दिवशी भक्त मानवी जीवनात त्याच्या योगदान साठी पवित्र गाईच्या प्रती धन्यवाद व कृतज्ञता प्रकट करतात. ह्यालाच नंदिनी व्रत असे सुद्धा म्हणतात.
गोवत्स द्वादशी ह्या दिवशी गाय नंदिनी ला श्रद्धांजलि दिली जाते. हिंदू संस्कृतिमध्ये गाय ही खूप पवित्र मानली जाते. असे म्हणतात की गाईच्या मध्ये 36 कोटी देवांचा वास आहे. म्हणूनच तिला माता म्हणून सुद्धा संबोधले जाते. ती मानव जीवनाचे पोषण करते.
वसुबारस ह्या दिवशी महिला नंदिनी व्रत आपल्या मुलांच्या दीर्घायुष्य व आनंदासाठी करतात. असे म्हणतात की ज्या विवाहित जोडीला संतान नाही त्यांनी ह्या दिवशी गाईची पूजा करून उपवास करतात त्यांना लवकरच संतान प्राप्ती होते. उपवास करताना गव्हाचा पदार्थ किंवा दुधा पासून बनवलेला पदार्थ सेवन करू नये.
वासुबारस हा सण जे उत्साहात साजरा करतात त्यांना खुशी व समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. ह्या दिवशी पहिला दिवा लावला जातो. तसेच उडदाचे वडे व गोड पदार्थ गाईला खाऊ घालतात.