धनतेरस धनत्रयोदशी ह्या दिवशी झाडू का खरेदी करतात? लाभ काय?
Dhanteras 2023: Significance Of Buying A New Broom On Dhantrodashi
धनत्रयोदशी ह्या दिवशी सोने-चांदी व भांडी खरेदी बरोबर झाडू पण खरेदी करण्याची प्रथा आहे. असे म्हणतात की धनत्रयोदशी ह्या दिवशी झाडू खरेदी करून घरात आणला तर आर्थिक समृद्धी वाढून लक्ष्मी माता प्रसन्न होते. धनत्रयोदशी ह्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते.
चला तर मग बघू या धनत्रयोदशी ह्या दिवशी झाडू खरेदी करून आणण्याचे लाभ काय आहेत.
धनत्रयोदशी कार्तिक मासच्या त्रयोदशी ह्या दिवशी साजरी करतात व ह्या दिवशी झाडू खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशी ह्या दिवसाला धन तेरस असे सुद्धा म्हणतात. ह्या दिवशी माता लक्ष्मी व कुबेर देवता ह्यांची पूजा करतात. ह्या दिवशी सोने-चांदी किंवा भांडी अगदी आवर्जून खरेदी करण्याची परंपरा आहे. त्याच बरोबर झाडू सुद्धा खरेदी करतात. धनत्रयोदशी ह्या दिवशी झाडू खरेदी करून घरात आणा माता लक्ष्मीची कृपा नेहमी आपल्या घरावर राहते. त्यामुळे संपूर्ण वर्ष आपल्या घरावर कृपा राहते व कधी सुद्धा धनाची कमतरता रहात नाही.
धनत्रयोदशी ह्या दिवशी झाडू का खरेदी करतात?
धनत्रयोदशी ह्या दिवशी बेरेच लोक नवीन झाडू खरेदी करून घरात आणतात त्यामागे एक कारण आहे.
मत्स्य पुराण मध्ये असे सांगितले आहे की झाडू माता लक्ष्मीचे प्रतीक आहे. त्यामुळे धनत्रयोदशी च्या दिवशी झाडू खरेदी केल्याने आर्थिक सुधारणा होते व माता लक्षी प्रसन्न होऊन आपल्या घरावर नेहमी कृपा ठेवते. असे म्हणतात की झाडू खरेदी करून आणल्याने संपूर्ण वर्षात आपल्या सर्व कार्या मध्ये सफलता मिळते व त्याच बरोबर सुख समृद्धी प्राप्त होते. सर्व आर्थिक परेशानी दूर होतात. ह्या दिवशी दोन झाडू खरेदी करतात एक संपूर्ण झाडू म्हणजे मोठा झाडू व एक छोटा झाडू आपण जो पूजेत ठेवतो तो पण एक गोष्ट लक्षात ठेवा की दोन्ही झाडू एका जागी ठेवू नये.
धनत्रयोदशी ह्या दिवशी पुढील गोष्टी लक्षात ठेवा:
* धनत्रयोदशी ह्या दिवशी झाडू खरेदी केल्यावर सर्वात पहिल्यांदा माता लक्ष्मीची पूजा करा मग झाडूला एक पंधरा दोरा बाधा असे केल्याने माता लक्षीची कृपा नेहमी आपल्यावर राहील.
* एक गोष्ट लक्षात ठेवा झाडू ला हात लावताना नेहमी स्वच्छ हात धुवून मग हात लावा. कधी सुद्धा अपवित्र शरीरानी झाडू ला स्पर्श करू नका असे केल्याने माता लक्ष्मी नाराज होऊन आर्थिक संकट येते.
*झाडूला कधी सुद्धा उभे ठेवू नये. कारण की ते अशुभ असे मानतात त्याला नेहमी सरल ठेवा.
*घरात झाडू नेहमी अश्या जागी ठेवा की बाहेरून आलेल्या व्यक्तिची त्यावर नजर राहणार नाही.
*धनत्रयोदशी ह्या दिवसाच्या अगोदर घराची साफसफाई करून जुना झाडू घरातून काढून टाका व त्या जागी नवीन झाडू ठेवा.