धनतेरस धनत्रयोदशी एक दिवा येथे लावा यमराज प्रसन्न होतील अकाल मृत्यू टळेल
Dhanteras 2023 Yam Ka Diya Time And Place in Marathi
10 नोव्हेंबर धनत्रयोदशी शुक्रवार ह्या दिवशी आहे. आपण ह्या अगोदरच्या विडियोमध्ये किंवा आर्टिकल मध्ये धनतेरस ह्या दिवसाची संपूर्ण माहिती पाहिली आहे. आता आपण ह्या दिवसाचे अजून एक महत्व आहे ते कोणते आहे ते पाहू या.
धनत्रयोदशी ह्या दिवशी आपण सोने-चांदी किंवा भांडी खरेदी करण्यात खूप व्यस्त असतो आपण ह्या दिवशी संध्याकाळी एक दिवा लावायला विसरू नका. शास्त्रा नुसार धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी दीपदानचे खूप महत्व आहे. असे म्हणतात की ह्या दिवशी दीपदान केल्याने यमराज प्रसन्न होतात व अकाली मृत्यू होण्या पासून बचाव होतो.
धनत्रयोदशी ह्या दिवशी दीपदान का करायचे त्याची एक कहाणी आहे.
एकदा यमराज नी त्याच्या दूतांना विचारले की जेव्हा लोकांचे प्राण जातात तेव्हा तुम्हाला दुख होते का? तेव्हा यमदूतनी सांगितले की आम्हाला एक राज कुमारचे प्राण जाते वेळी खूप दुख झाले. कारणकी राजकुमारचे लग्न होऊन फक्त 4 दिवसच झाले होते.
राजकुमारच्या मृत्यूची बातमी राजमहालात पसरली त्यामुळे सगळीकडे हाहाकार झाला. नववधूची आवस्था खूप वाईट झाली होती. ते पाहून यमदूतनी यमराजना विचारले की असा काही उपाय आहे का त्यामुळे कोणाचा सुद्धा अकाली मृत्यू होणार नाही.
मग यमराजनी सांगितले की जो कोणी व्यक्ति धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी यमराजच्या नावानी दिवा लावेल व यमराजचे स्मरण करेल त्याच्या घरात अकाली मृत्यूचे भय राहणार नाही.
धनतेरस धनत्रयोदशी एक दिवा कोठे व कधी लावावा:
धनत्रयोदशी ह्या दिवशी माता लक्ष्मीची मनोभावे पूजा अर्चा करावी. घरात दिवे लावावे. पूजा अर्चा करावी आरती म्हणावी.
धनत्रयोदशी ह्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला कणकेचा दिवा लावावा. म्हणजे दिव्याची वात दक्षिण दिशेला पाहिजे. जमिनीवर दिवा ठेवताना प्रथम तांदूळ ठेवावे मग त्यावर दिवा ठेवावा. दिव्याची हळद-कुंकु वाहावे, फुले अर्पित करावी. घरातील सर्व लोकांनी हात जोडून प्रार्थना करावी दीर्घायुष्यसाठी नमस्कार करावा. मग घरात निघून यावे. दिवा मोठा घ्या म्हणजे बऱ्याच वेळा पर्यन्त तेवत राहील. दिवा मध्ये शक्यतो मोहरीची तेल घालावे.
धनत्रयोदशी ह्या दिवशी संध्याकाळी 6: 30 ते 9:00 ह्या वेळात दिवा लावावा.