लक्ष्मी पूजन 2023: लक्ष्मी-गणेश व कुबेर देव पूजा मुहूर्त व सटीक मंत्र
Lakshmi Pujan 2023: Lakshmi-Ganesh-Kuber Bhagwan Puja Muhurat And Mantra In Marathi
आपणा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, ही दिवाळी आपणा सर्वाना सुखाची-समाधानाची-समृद्धीची व आरोग्यदाई जावो हीच ईश्वरा जवळ प्रार्थना!
हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण खूप महत्वाचा मानला जातो. दिवाळीह्या सणाला दीपोत्सव दीपावली ह्या नावांनी सुद्धा ओळखले जाते. दिवाळी ह्या सणाला लक्ष्मी-गणेश व कुबेर भगवान ह्यांची पूजा अर्चा केली जाते.
आपण पाहू या लक्ष्मी-गणेश व कुबेर भगवान ह्यांच्या पूजेचा मुहूर्त व पूजाविधी:
दरवर्षी कार्तिक अमावस्या ह्या तिथीला दिवाळी साजरी केली जाते. ह्या वर्षी दिवाळी 12 नोव्हेंबर 2023 रविवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. असे म्हणतात की लक्ष्मी पूजनच्या दिवशी माता लक्ष्मीचे पृथ्वीवर आगमन होते. म्हणून संध्याकाळी माता लक्ष्मीसाठी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवतात. दिवाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी माता लक्ष्मी बरोबर श्री गणेश व कुबेर भगवान ह्यांची पुजा अर्चा करतात.
दिवाळी शुभ मुहूर्त: (Diwali 2023 Shubh Muhurat)
कार्तिक मास अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर रविवार दुपारी 2 वाजून 44 मिनिट सुरू होणार असून समाप्ती 13 नोव्हेंबर 2023 सोमवार ह्या दिवशी दुपारी 2 वाजून 56 मिनिट होणार आहे. म्हणून दिवाळी रविवार ह्या दिवशी साजरी करायची आहे. त्याच बरोबर माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी प्रदोश काळ हा सर्वात उत्तम मानला जातो.
लक्ष्मी पूजन मुहूर्त:
निशिता काळ मुहूर्त: 12 नोव्हेंबर रात्री 11 वाजून 35 मिनिट पासून 13 नोव्हेंबर रात्री 12 वाजून 32 मिनिट पर्यन्त
प्रदोष काळ: संध्याकाळी 5 वाजून 29 मिनिट पासून सुरू होत असून रात्री 8 वाजे पर्यन्त आहे.
वृषभ काळ: संध्याकाळी 5 वाजून 39 मिनिट पासून 7 वाजून 35 मिनिट पर्यन्त
चौघडिया पुजा मुहूर्त: 12 नोव्हेंबर दुपारी 1 वाजून 26 मिनिट पासून 2 वाजून 46 मिनिट पर्यन्त
लक्ष्मी पूजन कसे करावे:
दिवाळीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा. काही साधक ह्यादिवशी उपवास सुद्धा करतात. मग देवाचे स्मरण करत आपल्या देवघरा जवळ चौरंग ठेवा त्यावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र अंथरा. आता श्री गणेश व माता लक्ष्मीची प्रतिमा स्थापित करा. लक्षात ठेवा की प्रतिमाचे मुख पूर्व किंवा पश्चिम दिशेला पाहिजे.
मग प्रतिमाच्या समोर एक कलश स्थापित करून त्यावर 5 विडयाची पाने ठेवून त्यावर नारळ ठेवा. लमाता लक्ष्मी व श्री गणेश भगवान ह्यांच्या बाजूला 2 दिवे प्रज्वलित करा. त्याच्या समोर 2 विडयाची पाने ठेवून त्यावर सुपारी, खारीक, खोबर, बदाम व हळकुंड ठेवा.
आता माता लक्ष्मी व श्री गणेश व कुबेर भगवान ह्यांना हळद, कुंकु, अक्षता व फूल अर्पित करा. काही नाणी सुद्धा ठेवा. नेवेद्य म्हणून लाह्या बत्तासे व काही गोड पदार्थ ठेवा. मग आरती करून पुढे दिलेला मंत्र 108 वेळा म्हणा मग मनोभावे प्रार्थना करा.
मंत्र:
1). लक्ष्मी बीज मंत्र: ॐ ह्रीं श्रीं लक्ष्मीभ्यो नमः॥
अर्थ: “हे लक्ष्मीदेवी, ह्रीं व श्रीं च्या द्वारे आम्ही तुला नमस्कार करीत आहोत॥”
2). महालक्ष्मी मंत्र: ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्मयै नमः॥
अर्थ: “हे लक्ष्मीदेवी, हे कमलेश्वरी, कृपया आम्हाला धन, समृद्धि, व श्रेष्ठता प्रदान करा ॥”