भाऊबीज मुहूर्त 2023 आज फक्त इतका वेळच आहे भावाला ओवाळण्याचा मुहूर्त :
Diwali Bhai Dooj Muhurat in Marathi
भाऊबीज हा सण भाऊ-बहीण ह्यांना समर्पित आहे. ह्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून त्याच्या मंगल कामनासाठी प्रार्थना करते.
भाऊबीज हा सण भाऊ व बहीण ह्याच्या प्रेमाचे प्रतीक आहे. हिंदू पंचांग नुसार दरवर्षी कार्तिक मासच्या शुक्ल पक्ष द्वितीया तिथीला भाऊबीज हा सण साजरा केला जातो. दिवाळी हा सण धनतेरस पासून सुरू होत असून भाऊबीज ह्या सणाला संपतो. पण ह्या वर्षी अमावस्या दोन दिवस होती त्यामुळे दिवाळी हा सण 6 दिवस होता. कारणकी दिवाळी व गोवर्धन पूजा ह्या मध्ये एक दिवसाचे अंतर पडले.
चला तर मग पाहूया भाऊबीज ह्या दिवशी ओवळण्याची वेळ काय आहे:
द्वितीय तिथी 14 नोव्हेंबर दुपारी 2 वाजून 36 मिनिट पासून सुरू होत असून 15 नोव्हेंबर 1 वाजून 47 मिनिट नी समाप्त होत आहे.
भाऊबीज ओवळण्याच्या मुहूर्त:
लाभ _ उन्नती :10:44 सकाळी ते 12:04 दुपारी
अमृत-सर्वोत्तम : दुपारी 12:04 ते 1:25
शुभ: उत्तम: 2:46 ते 4:07
लाभ; उन्नती संध्याकाळी 7:07 ते 8:46
शुभ: उत्तम 10:25 रात्री ते 12:05 15 नोव्हेंबर
अमृत: सर्वोत्तम: 12:05 ते 1:44 15 नोव्हेंबर
भाऊबीज ह्या सणाचा इतिहास:
हिंदू पौराणिक कथा अनुसार, भगवान श्री कृष्ण ने नरकासुर ला हरवून आपली बहीण सुभद्रा ल भेटायला गेले होते. सुभद्रानी मिठाई व फुलांनी त्याचे स्वागत केले होते व त्यांच्या कपाळावर तिलक लावला होता. म्हणून ह्या दिवसा पासून भाऊबीज हा सण साजरा करतात. अजून एक कथा आहे मृत्यू चे देवता यम आपली बहीण यमुनाला भेटायला गेले जीने आपल्या भावाचे तिलक लावून स्वागत केले तेव्हा यामानी निर्णय घेतला की ह्या दिवशी जी कोणी बहीण आपल्या भावाला तिलक लाऊन मिठाई सेवन करायला देईल तर त्या भावाला दीर्घ आयुष्यचा आशीर्वाद मिळेल.
भाऊबीज ह्या सणाचे महत्व:
भाईदुज चा अर्थ भाई म्हणजे भाऊ व दुज म्हणजे अमावस्याच्या नंतरचा दूसरा दिवस. भाऊबीज ह्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळून तिलक लावते व त्याच्या दीर्घआयुष्य साठी व त्याचे सर्व मंगलमय होवो म्हणून प्रार्थना करते. मग भाऊ आपल्या बहिणीला भेट वस्तु देतो.