थंडीमध्ये रात्री झोपताना चेहऱ्यावर काय लावावे? ज्याने त्वचा सॉफ्ट व चमकदार दिसेल
Night Skin Care Routine For Winter In Marathi
थंडी हा सीझन चालू झाला की आपल्याला आपल्या त्वचाची काळजी काशी घ्यावी ह्याच प्रश्न पडतो. कारण की थंडी मध्ये त्वचा कोरडी पडते. त्यासाठी काही सोपे 5 उपाय आहेत ते करून पहा.
थंडीमध्ये रात्री झोपताना चेहऱ्यावर काय लावावे? ह्या विडियो ची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: थंडीमध्ये रात्री झोपताना चेहऱ्यावर काय लावावे?
आपण सगळे आपल्या त्वचेवर प्रेम करतो. आपल्याला नेहमी असे वाटते की आपली स्कीन मुलायम व चमकदार बनावी. पण सीझनमध्ये बदल झालकी त्याचा परिणाम आपल्या स्कीनवर होतो. जेव्हा आपण गरमीच्या सीझन मधून थंडीच्या सीझन मध्ये प्रवेश करतो तेव्हा. खास करून थंडीच्या सीझन मध्ये स्कीन कोरडी व खरखरीत होते, खाज येते अश्या गोष्टींचा सामना करावा लागतो. काही जणांना चेहऱ्याववर पिंपल्स, डाग, मूहासे येतात. कारणकी आपण सीझन नुसार आपल्या स्कीनसाठी स्कीनकेअर वापरत नाही. आपण सीझन नुसार स्कीन केअर लोशन वापरले पाहिजेत व ते आपल्या रोजच्या रुटीन मध्ये शामिल करून घेतले पाहिजेत. बरेच लोकांना माहीत नसते की थंडीच्या सीझन मध्ये रात्री आपल्या चेहऱ्यावर काय लावावे.
थंडीच्या सीझनमध्ये रात्री स्कीनकेअर रुटीन कसे असावे ते आपण पाहू या:
1. दुधाचा वापर करावा:
रात्री झोपण्याच्या अगोदर आपण आपला चेहरा नेहमी स्वच्छ केला पाहिजे. त्यासाठी आपण क्लींजर चा वापर करू शकता. खास करून दुधाचा वापर. दूध आपल्या स्कीनच्या मुळा पर्यन्त सफाई करते. कारण की त्यामध्ये लैक्टिक एसिड आहे. जे क्लींजरच्या रूपात काम करते. दूध स्कीनमधील साठलेला मळ काढते. त्याच बरोबर आपली स्कीन मुलायम व कोमल ठेवण्यास मदत करते.
2. मॉश्चराइजर लावा:
त्वचा स्वच्छ केली किंवा फेसवॉश केल्यावर चेहरा मुलायम ठेवण्यासाठी मॉइश्चराइज करणे खूप जरुरीचे आहे. त्यासाठी आपण नेचुरल मॉइचराइजरचा प्रयोग करू शकता. त्याच बरोबर जेल किंवा क्रीमचा वापर करू शकता.
3. हाइड्रेटिंग मास्क लावा:
आपण आठोडयातून एकदा तरी हाइड्रेटिंग मास्क लावला पाहिजे. त्यामुळे त्वचेमध्ये मुलायम पणा राहतो व कोरडी होत नाही.
हाइड्रेशन फेस मास्क काय करते?
एक हाइड्रेटिंग मास्क आपल्याला एक सांवला रंग देते जे आपल्या तारुण्य व जीवनाशी निगडीत आहे. त्याच बरोबर आपल्या त्वचे मध्ये सुधार करते. त्वचेमधील तेलाचे प्रमाण कमी करते त्याच बरोबर आपल्या त्वचे मधील छिद्र मोकळी करते व आपल्या स्कीन चांगली ठेवते.
4. डेड स्किन साफ करणे:
आपण आठोडयातून एकदा तरी आपली डेड स्कीन साफ केली पाहिजे त्यासाठी स्कीनला एक्सफोलिएट जरूर करायला पाहिजे, एक्सफोलिएट म्हणजे डेड झालेली स्कीन जीवंत करणे. म्हणजेच काय होते डेड झालेली स्कीन आपल्या स्कीन वरील छिद्र बंद करून मुरूम पुटकुल्या यायला लागतात.
5. मालिश करा:
आपण आपल्या चेहऱ्यावर नारळाचे तेल, किंवा मोहरीचे तेल वापरुन आठोडयातून 1-2 वेळा मालीश करू शकतो. ते आपले स्कीन चांगली ठेवते व चमकदार ठेवून मुलायम ठेवते.