दिवाळी लक्ष्मी पूजा लाह्या राहिल्या बनवा मुलांचा आवडीचा पदार्थ | लक्ष्मी पूजा खील रेसीपी
Salichya Lahya Cha Chivda For Kids Tiffin In Marathi
दिवाळीच्या वेळी आपण लक्ष्मी पूजनच्या वेळी लाहया व बत्तासे आणतो. बत्तासे आपण चहा मध्ये साखर आयवजी बत्ता से घालून संपवतो किंवा लहान मुलांना प्रसाद म्हणून खायला देतो. पण नुसत्या लाहया आपण थोडासा प्रसाद म्हणून सेवन करतो. मग बाकीच्या तश्याच राहून जातात.
साळीच्या लाहया आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. त्या रोज सेवन केल्यास आपली पचनक्रिया चांगली होते, लहान मुलांना व मोठ्या माणसांनी सुद्धा सेवन कराव्या त्यामुळे मूत्र पिंडाचे विकार, रक्तदाब वर नियंत्रण राहते व पित कमी होते. आपल्या हाडांचे आरोग्य चांगले राहते, हृदयाचे आरोग्य चांगले राहते, अॅंटी ऑक्सिडेंटस भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते.
साळीच्या लाहया व बत्तासे सेवनाचे आरोग्यदाई फायदे ह्याच विडियो पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता: साळीच्या लाहया व बत्तासे सेवनाचे फायदे
साळीच्या लाहया सेवणाने शरीराचे वजन सुद्धा कमी होऊ शकते.
साळीच्या लाहया वापरुन आपण एक छान पदार्थ अगदी झटपट सोपा बनवू शकतो. साळीच्या लाहयाच्या चिवडा मस्त टेस्टि लागतो.
बनवण्यासाठी वेळ: 10 मिनिट
वाढणी: 2 जणांसाठी
साहित्य:
200 ग्राम साळीच्या लाहय
1/2 कप शेंगदाणे
1 टी स्पून लाल मिरची पावडर,
1/2 टी स्पून हळद
मीठ चवीने
फोडणी करिता:
3 टे स्पून तेल
1 टी स्पून मोहरी
1 टी स्पून जिरे
10-15 कडीपत्ता पाने
2-3 हिरव्या मिरच्या
साहित्य: प्रथम लाहया साफ करून घ्या. कडीपत्ता धुवून पुसून बाजूला ठेवा, हिरव्या मिरच्या धुवून चिरून घ्या.
एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. मग त्यामध्ये शेगदाणे घालून 2 मिनिट परतून घ्या, मग त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या घालून थोड्या परतून घ्या.
आता त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, मीठ चवीने घालून मिक्स करून त्यामध्ये लाहया घाला. मग मंद विस्तवावर मिक्स करून 2-3 मिनिट परतून घ्या.
साळीच्या लाहयाचा चिवडा थंड झाल्यावर मुलांना डब्यात द्या. मस्त लागतो व पौष्टिक सुद्धा आहे.