लक्ष्मी पूजन साळीच्या लाहया व बत्तासे सेवनाचे बरेच फायदे
Salichya Lahya w Battase Sewana Che Fayde (Health Benefits) in Marathi
साळीच्या लाहया व बत्तासे सेवन करणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
जर तोंडाचा अल्सर झाला असेतर किंवा त्याचा त्रास होत असेलतर लाहया बत्तासे जरूर सेवन करावे त्यामुळे तोंडाची सूज कमी होऊन दुखणे सुद्धा कमी होते.
साळीच्या लाहया खर म्हणजे धार्मिक कार्यासाठी वापरतात. दिवाळीच्या वेळी त्या लक्ष्मी पूजन, धनत्रयोदशी ह्या वेळी वापरतात. तेव्हा बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. पण त्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप उपयोगी आहेत.
दिवाळी मध्ये आपण तेलकट, तुपकट व मसालेदार पदार्थ सेवन करतो त्यामुळे अपचन होते किंवा पिकत्त वाढते व ढेकर येतात तर अश्या वेळी लाहया व बत्तासे सेवन करा ते पचायला हलके असतात व पोटाचे विकार सुद्धा कमी होतात.
साळीच्या लाहया पचायला अगदी हलक्या असतात त्यामुळे लहान मुलांना जरूर सेवन करण्यास द्याव्या. त्यामुळे शरीरीक वाढ चांगली होते व मूत्र पिंडाचे विकार, रक्तदाब वर नियंत्रण राहते व पित कमी होते.
थंडीच्या दिवसांत साळीच्या लाहया अगदी आवर्जून सेवन कराव्या कारण की थंडीच्या दिवसांत ते आपल्या शरीरासाठी औषधाचे काम करते. असे म्हणतात की आजारी माणसाला साळीच्या लाहयाचे पानी दिल्यास ते एक सलाईनचे काम करते.
साळीच्या लाहया बाराही महीने उपलब्ध होतात त्यामुळे अगदी लहान मुलांपासून ते मोट्या माणसांपर्यंत सर्वानी सेवन कराव्यात.
थंडीच्या दिवसांत कफ चा त्रास उद्भवतो त्यासाठी साळीच्या लाहया सेवन केल्यास त्याचा त्रास कमी होतो व शरीराला आराम मिळतो.
महिलांनी साळीच्या लाहया जरूर सेवन कराव्या. महिलांना मासिक पाळीच्या वेळी पोटदुखी, अंगदुखी, कंबर दुखी अश्या प्रकारचा त्रास होतो. जर महिलांनी साळीच्या
लाहया नियमित सेवन केल्या तर त्यांचा त्रास कमी होऊ शकतो. PCOS व PCOD चा त्रास असणाऱ्यानी साळीच्या लाहया जरूर सेवन कराव्यात . त्यामुळे त्याना नक्कीच फायदा होईल.
साळीच्या लाहया सेवना मुळे शरीराला ऊर्जा मिळते तसेच भूक कमी लागते त्यामुळे ज्याना शरीराचे वजन कमी करायचे आहे त्यांनी जरूर सेवन कराव्यात.
साळीच्या लाहया सेवन करण्याचा अजून एक खूप महत्वाचा फायदा म्हणजे हृदयाचे कार्य सुधारून रक्त वाहिन्याचे कार्य सुरळीत होते. रक्त दाब सुद्धा नियंत्रणात राहतो. ज्याना हृदयाचा त्रास आहे त्यांनी साळीच्या लाहया नियमित सेवन कराव्या.
साळीच्या लाहया सेवनाचा अजून एक फायदा आहे तो म्हणजे त्यामुळे अॅंटी ऑक्सिडेंटस भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राहते. म्हणून साळीच्या लाहया जरूर सेवन कराव्यात. साळीच्या लाहयाची पावडर दुधात मिक्स करून आपल्या चेहऱ्यावर लावली तर तो फेसपॅकचे उत्तम काम करतो. त्यामुळे तोंडावरील फोड कमी होतात किंवा दाग असतील तर ते कमी होतात तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
बत्तासे सेवनाचे फायदे:
बत्तासे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने फायदेमंद आहेत पण ते शुद्ध तुपा बरोबर सेवन केल्यास त्याचे अजून फायदे होतात.
बत्तासेमध्ये विटामीन ए, डी, के, कॅल्शियम, फॉस्फरस, मिनरल व पोट्याशीयम अश्या प्रकारे पोषक तत्व आहेत. म्हणून बत्तासे नेहमी तुपा बरोबर सेवन करावे त्यामुळे अजून एक मोठा फायदा हा आहे की त्यामुळे मेंटल हेल्थ सुधारते आपली स्मरण शक्ति सुद्धा सुधारते. तूप आपल्या शरीराला फायदेमंद आहेच.
तूप व बत्तासे सेवननाने पचन क्रिया सुधारते. सीझन बदल, किंवा आपण बऱ्यास वेळा जंकफूड सेवन करतो त्यामुळे पोट बिघडते, उलटी होते पोट दुखी होते तेव्हा तूप व बत्तासे जरूर सेवन करावे.
तूप व बत्तासे सेवन करण्या मुळे शरीराचे वजन वाढवायचे असेलतर फायदेमंद आहे. त्यापासून शरीराला मुबलक फ्यट सुद्धा मिळतात.
अजून एक फायदा असा आहे की तुपा मुळे वात कमी होतो व कफ सारख्या समस्या दूर होतात.
तूप व बत्तासे सेवन करण्यामुळे लहाम मुलांचे व मोठ्या माणसांचे हाडाचे आरोग्य चांगले राहते. आपली हाडे मजबूत राखण्यास मदत होते.