सुख समृद्धी व कृपा मिळण्यासाठी कार्तिक महिन्यात हे उपाय करा
Significance Or Importance Of Kartik Month In Marathi
सनातन धर्मामध्ये प्रतेक महिन्याचे विशेष महत्व आहे. पण कार्तिक महिना सर्वात महत्वाचा मानला जातो. ह्या महिन्यात धनतेरस, दिवाळी, अन्नकूट, देवोत्थान एकादशी, छठ पूजा, तुलसी पूजन व देव दीपावली इ व्रत सण असतात. कार्तिक मास हा भगवान विष्णुचे स्वरूप आहे. ह्याला सबुद्धि, लक्ष्मी व मोक्ष प्राप्ती चा महिना असे म्हणतात.
कार्तिक मास मध्ये करावयाचे उपाय ह्या विडियोची लिंक पुढे दिलेली आहे तेथे क्लिक करून पाहू शकता: कार्तिक महिन्यात करावयाचे उपाय
कार्तिक महिन्यात पुढे दिलेले काही उपाय केलेतर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात.
* तुळशीची पूजा: सनातन धर्मामध्ये कार्तिक मासमध्ये रोज तुळशीची पूजा करण्याचे महत्व आहे. कार्तिक मासमध्ये तुळशीच्या समोर रोज दिवा लावल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कार्तिक महिन्यात रोज तुळशीची पूजा अर्चा करून दिवा लावल्याने भगवान विष्णु ह्याची कृपा मिळते. पुरणामद्धे असे म्हंटले आहे की ज्या घरात तुळशी असते त्या घरात यमदूत प्रवेश करीत नाहीत.
* पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे महत्व: कार्तिक महिन्यात पवित्र नदीमध्ये म्हणजे गंगा, यमुना मध्ये स्नान करणे महत्वाचे आहे. ह्या महिन्यात असे केल्याने रोग मुक्ती मिळते व घरात सौभाग्यचे आगमन होते. स्नान करण्याची उत्तम वेळ सूर्योदयच्या अगोदर करणे. जर आपल्याला गंगा स्नान करणे शक्य नाहीतर घरातच पाण्यात गंगा जल घालून स्नान करावे.
* माता लक्ष्मीची पूजा अर्चा: कार्तिक महिन्यात अष्ट लक्ष्मीची पूजा करण्याचे महत्व आहे. अपार धन लाभ, संतान प्राप्ती व यश मिळण्यासाठी कार्तिक मास मध्ये शुक्रवार ह्या दिवशी अष्टलक्ष्मीची पूजा करावी. अष्टलक्ष्मीची पूजा केल्याने देवी माता प्रसन्न होऊन आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. ह्या दिवशी आंब्याच्या पानाचे किंवा अशोकाच्या पानाचे तोरण लावावे. हे शुभ व समृद्धीकारक मानले जाते. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरात धन व धान्यची कमी होऊ देत नाही.
* संध्याकाळी दीपदान करा: कार्तिक महिन्यात गंगा किंवा पवित्र नदीमध्ये दीपदान करणे शुभ मानले जाते. म्हणून ह्या महिन्यात पवित्र नदी, तालाब, मंदिर व खुले आकाश मध्ये दिवा जरूर लावावा. असे केल्याने पुण्य फळ मिळते.
* दान धर्म अवश्य करा: सुख-सौभाग्यमध्ये वृद्धी मिळण्यासाठी ह्या महिन्यात अन्न, दूध, फळ, तांदूळ, तीळ व आवळे जरूर दान करा. ह्या महिन्यात ब्राह्मण, बहीण व आत्या हयना आपल्या आयपती प्रमाणे वस्त्र व दक्षिणा आवश्य द्या. कार्तिक महिन्यात रोज पिंपळाच्या झाडाला पाणी व दूध मिक्स करून अर्पण करा. कारणकी पिंपळाच्या झाडामध्ये लक्ष्मी माता व विष्णुजीनचा वास असतो असे मानले जाते.
* कपूर जाला: कार्तिक महिन्यात रोज संध्याकाळी कापुर जाळून आरती करा असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते व सुख-शांती राहते. घरातील व्यक्तिमध्ये भांडण वादविवाद संपून स्नेह निर्माण होतो.
* कार्तिक महिन्यात देवतत्व प्रभावी असतात व ह्या महिन्यात भगवान विष्णु व तुळशीची पूजा करणे फलदाई असते. गंगा स्नान, दान-धर्म केल्याने संकट व कष्ट दूर होतात.
* कार्तिक महिन्यात भगवान विष्णु, माता लक्ष्मी, यम देवता, व पिपल देवता ह्याची पूजा करणे महत्वाचे मानले जाते. ह्याच्या समोर दिवा लावल्याने संकटा पासून मुक्ती मिळते व परिवारात सुख शांती मिळते.
* कार्तिक मास मध्ये लक्ष्मी स्तोत्रचे वाचन करावे. त्यामुळे जीवनात सुख समृद्धी येते. असे जे लोक करतात त्याना पुनर्जन्म मिळून चांगल्या कुळात जन्म घेतात.
* कार्तिक महिन्यात तुलसी विवाह करणे खूप शुभ मानले जाते. त्याच बरोबर तुळशीचे उपाय केल्याने वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात.
* कार्तिक महिन्यात भगवान विष्णु ह्यांना तीळ अर्पित करणे शुभ मानले जाते. असे केल्याने पापांन पासून मुक्ती मिळते. ह्या महिन्यात नियमित पणे जे तुळशील जल अर्पित करून तुळशीच्या मातीचा तिलक लावेल त्याची सर्व मनोकामना पूर्ण होतील.